पान:इतिहास-विहार.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिवचरित्रप्रदीप

१८१

हा सर्व भाग या दृष्टीनें वाचकांनीं अवश्य वाचावा. उलट बखरींमधून जन्मतिथीविषयीं जीं विधाने आढळतात त्यांत परस्पर मेळ किती थोडा आहे हे आपटे यांनी स्पष्ट करून दाखविलें आहे, तोहि मजकूर कसोशीनें वाचकांनी वाचावा अशी आमची शिफारस आहे. या दृष्टीनें २५८ ते २७५ या पानांत या ग्रंथाचे सारसर्वस्व आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. ज्योतिषविषयक चर्चा, किंवा ऐतिहासिक विषयक पण टीकाप्रतिटीकारूप कोटी - प्रतिकोटीरूप किंवा भानुषंगिक मंडनपर व खंडनपर ही सर्व चर्चा 1 देखील मार्मिक वाचकांस मनोरंजक वाटेल. परंतु ऐतिहासिक सत्य - निर्णयाच्या सर्वसंमत नियमांच्या कांटेकोर दृष्टीनें पाहावयाचे तर आम्ही वर दर्शविलेल्या भागांवरच वाचकांनी मुख्य दृष्टि द्यावी अशी आमची त्यांना सूचना आहे.

 शिवजन्मतिथिनिर्णयासारखे इतर वाद यापूर्वी इतिहाससंशोधनांत निघाले नव्हते असे नाहीं. १०१५ लेखकांविषयीं असें दाखवितां येईल कीं, त्यांनी नवा पुरावा स्वीकारून आपले जुने निर्णय स्वतःच चुकीचे ठरविले. परंतु जन्मतिथीचे उत्सव सर्वत्र होत असल्यामुळे या एका गोष्टीं- तील विचारक्रांति फारच मोठ्या प्रमाणावर परिणामकारक होणार म्हणून या वादाला अधिक महत्त्व आलेले असावें. तिथिनिर्णय व उत्सव यांचा जर कांहीं अर्थाअर्थी संबंध नसता तर, नव्या तिथिनिर्णयासंबंधानें शिव- कालीन पुराव्याला अधिक महत्त्व द्यावें लागेल आणि जेधे शकावलीचा उल्लेख निर्णायक मानला पाहिजे, याविषयीं इतका वाद झाला असता असे आम्हास वाटत नाहीं. असो. या वादाचा निर्णय आमच्या मतें कसाहि असला तरी इतर कोणी तो तसाच मानावा असा आमचा आग्रह नाहीं. परंतु हल्लींच्या या उत्कट वादामुळे ऐतिहासिक संशोधनांत सत्य- निर्णयाचे खरे नियम कोणते याचा वारंवार उच्चार होऊन ते वाचकांच्या मनावर चांगले चित्रले तरी देखील प्रस्तुत ग्रंथ प्रकाशित करण्याचा प्रका- शकांचा हेतु सफल झाला असे आम्ही मानूं व तेहि मानतील.