पान:इतिहास-विहार.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
केळकरांचे लेख

ज्यांना तो पटला नाहीं ते दुसऱ्या तिथीला असे दोनदोन जन्मोत्सवहि कांहीं दिवस होत राहणें संभवनीय आहे.

 रामकृष्णादिकांची म्हणजे केवळ पौराणिक विभूतींची जन्मतिथि एकच .. मानली जाते. तींत मतभेद नाहीं ! आणि ज्यांच्या जन्मतिथीचा पुरावा - प्रत्यक्ष कागदोपत्री मिळण्याचा संभव असतो अशा ऐतिहासिक पुरुषांच्या जन्मतिथीविषयीं मात्र वाद व विविधता राहावी है सकृद्दर्शनी- चमत्कारिक वाटतें. पण पूर्ण अज्ञानापेक्षां विकल्प उत्पन्न करणारैहि ज्ञान- कोणी झाला तरी अधिक श्रेयस्करच मानील. नवी तिथि सर्वसंमत न झाल्यामुळे निरनिराळे उत्सव झाले तर त्यांतहि वस्तुतः कांहींच हानि नाहीं. जन्मतिथींचा उत्सव असला तरी त्यांत जन्मतिथीपेक्षां ज्याची ती जन्मतिथि त्यांचा उत्सव हीच अधिक महत्त्वाची गोष्ट असते. यामुळे वर्षातून एकदां hi तरी सोयीप्रमाणेहि उत्सव कोणी केला असतां त्यांत कांहींच बिघडत नाहीं. उलट आम्ही असेंहि घेऊन चालतों कीं, ज्यांनी नवी जन्मतिथि आज आपल्या मतें निर्णायक म्हणून स्वीकारिली आहे. त्यांना हि जर उद्यां उलट दृष्टीचा अधिक व निर्णायक पुरावा मिळाला तर तेहि आपली चूक कबूल करून आपलें मत खचित बदलतील आणि फिरून पूर्वीच्या तिथीतच उत्सव करूं लागतील. कारण या कार्मी अभिमान सत्याचा, व्यक्तीचा नव्हे.

 प्रस्तुत वाद असा आहे कीं, त्यांतल्या त्यांत अधिक जुने - विशेषतः शिवकालीन असे जे ऐतिहासिक आधार नव्या तिथीविषयीं उपोदलक सांडतात त्यांना कितपत महत्त्व द्यावयाचें ? या दृष्टीने पाहतां बखरीपेक्षां शिवभारत किंवा जेधे शकावली यांचे महत्व कोणीहि मान्य करील असें आम्हांस वाटतें. समकालीन पुरावा, पण तो अविश्वसनीय, खोटा, बनावट, असें कोणत्याहि स्वतंत्र गमकानें ठरवितां आल्यास गोष्ट वेगळी. पण वरील दोन आधारांविषयीं जोपर्यंत तशा प्रकारचे आक्षेप सिद्ध झालेले नाहीत तोपर्यंत समकालीन पुरावा या नात्यानें त्या साधनांचा श्रेष्ठ दर्जा मान्य करणें प्राप्त होतें. जेधे शकावलीविषयीं जे आक्षेप उत्पन्न होतात. ते जमेस धरून त्यांची उत्तरें आपटे यांनी दिलेलीं आहेत तो मजकूर, आणि जेधे शकावलीच्या विश्वसनीयतेविषयीं उदाहरणांसह दिलेला मजकूर,