पान:इतिहास-विहार.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिवचरित्रप्रदीप

१७९

 वरील यादीवरून प्रस्तुत ग्रंथांतील लेखांच्या महत्त्वाची कल्पना सहजच येईल, आतां संग्रहकारांनी विषयांसंबंधों अनुक्रम आणि एकसूत्रता ठेवावी तो न ठेवल्या कारणानें ग्रंथाला एक प्रकारें कथेचें किंवा गोधडीचें स्वरूप आले आहे. इतका मौल्यवान् मजकूर देऊन तो यथाक्रम एकत्र न दिल्यानें मुख्य विषयासंबंधानें वाचकांचें अनुसंधान राहत नाहीं, हा एक दोष असा आम्हांला वाटतो. पण गोधडी झाली तरी शालजोड्यांच्या तुकड्यांची आहे हि लक्षांत ठेविले पाहिजे. कदाचित् ग्रंथरचनेतील ही अव्यवस्था ग्रंथाची मूळ कल्पना कसकशी परिणत झाली याविषयींची साक्ष देते. हा दोष वगळला असता इतक्या किंमतीत इतके महत्त्वाचे शिवकालीन मूळ लेख आणि चर्चा लेख एकत्र संग्रहित असे वाचकाला कोठेहि मिळणार. नाहींत. याकरितां प्रत्येक इतिहासभक्तानें हा ग्रंथ विकत घेऊन प्रकाशक- नीं, केवळ हौसेनें, इतिहासप्रेमाने व सत्यनिर्णयांच्या इच्छेनें, डोक्यावर. घेतलेले खर्चाचे ओझें उतरण्यास अवश्य मदत करावी अशी आमची विनंति आहे.

 मुख्य वादासंबंधानें कोणीहि हें कबूल करील कीं, शिवजन्माची नवी तिथी एकदम कोणी मान्य करो वा न करो, पण आपटे व करंदीकर यांनी केलेल्या चर्चेवरून नव्या दिशेनें विचाराचे उदबोधन तीन होते, अशा वादांत एकाद्या नव्या शोधाचा किंवा ऐतिहासिक गोष्टींचा स्वीकार करणें न करणे ही गोष्ट सर्वस्वी कोणाच्याहि इच्छेवरच अवलंबून राहणार; त्यांत जुलूम जबरदस्ती होऊं शकत नाहीं व कोणी करीतहि नाही. प्रत्यक्ष दृक्प्रत्ययासारखें निर्णयसाधन उपलब्ध असतांहि, पुष्कळ लोक पंचांगशुद्धि न स्वीकारतां परंपरागत पंचांग प्रमाण मानून व त्याप्रमाणे धर्मव्यवहार करून पुण्य जोडलें असें समजतात. तर ऐतिहासिक सत्यनिर्णय कितीहि खात्री पटविण्यासारखा असला तरी तो किती मानणार? म्हणून प्रस्तुत बाद उपस्थित करणारांना देखील अशी मोठी आशा नसेल कीं, त्यांचा निर्णय सर्व इतिहासप्रेमी लोक एकदम मानतील. किंबहुना हल्लींच्या पंचांगवादामुळें महाराष्ट्रीय समाजांत तिथि, संक्रांति, अधिक मास हे जसे आपापल्या आवडीप्रमाणे निरनिराळे पाळणारे लोक आढळतात, त्या- प्रमाणे ज्यांना नवीन शिवजन्मतिथिनिर्णय पटला ते एका तिथीला आणि