पान:इतिहास-विहार.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
केळकरांचे लेख


किती तरी पटीने अधिक संपत्तिमान् आहेत." १७ व्या शतकांत हिंदु- स्थानचे वैभव अगदी कळसास जाऊन पोहोंचलें होतें.

 अशा प्रकारचे लोक येथे होते. व या प्रकारचीं राज्ये व साम्राज्ये होतीं. तेव्हा अशा पूर्वजांच्या वंशजांनी पाश्चिमात्यांचे शिक्षण व संस्कृति यांची जोड मिळाल्यावर राज्यकारभारांत समान हक्क मिळवून हिंदी खराज्य संस्थापनेची आकांक्षा धरावी यांत आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे !

शिवचरित्रप्रदीप

प्रस्तुत पुस्तक मुख्यतः शिवजन्मतिथीच्या वादाला उद्देशून तयार केलेलें • आहे. तथापि तो प्रसंग साधून शिवकालविषयक असे अनेक लेख, टिपूर्णे शकावल्या वगैरे मिळून अवांतर मजकूर इतका चांगला व इतका पुष्कळ या ग्रंथांत दिला आहे की, शिवजन्मतिथीचा बाद हैं त्यांतलें एक केवळ उपांग ठरेल. त्यांतल्या त्यांत वाचकांच्या दृष्टीला आणण्यासारखे भाग म्हटले म्हणजे जेधे यांची शकावली व करीना, शिवापूरकर देशपांडे : यांचे वहींतील व घोडेगांवकर वहींतील शकावल्या, गदाधर प्रल्हाद शका : वली, अफझुलखानासंबंधी व इतर कांहीं शिवकालीन अस्सल पत्र, भोसले :: वंशावळ, राजव्यवहारकोश, शहाजीविषयक शकावली, तंजावरचा शिला लेख वगैरे होत. मुख्य शिवजन्मतिथीच्या वादासंबंधाने प्रकाश पाडणारे : भाग खालील आहेत - लो० टिळक व इतिहाससंशोधक राजवाडे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी केलेली चर्चा, राजवाडे यांनीं राधामाधवम्वम्पूच्या - प्रस्तावनेंत अलीकडे केलेली चर्चा, निरनिराळ्या बखरींतून उतरून घेत- लेली शिवजन्माची वर्णनें, श्री० व्यंकटेश बापूजी केतकर यांचे शिवजन्म-: तिथीविषयीं केलेले ग्रहगणित, के० वासुदेवशास्त्री खरे यांनीं मालोजी शहाजीवरील निबंधांत उल्लेखिलेलें शंकास्थान, शिवभारत व तंजावरचा शिलालेख यांमध्ये असलेल्या जन्मतिथीचा उल्लेख, आपटे व करंदीकर यांचे जन्मतिथीची चर्चा करणारे ऐतिहासिकदृष्टया व ज्योतिषशास्त्रदृष्टया : लिहिलेले लेख इत्यादि.


केसरी, ता. ३ फेब्रुवारी १९२६.