पान:इतिहास-विहार.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१७७

होऊन जात. दिल्लीच्या तख्ताभोवतालची अनुपमेय शोभा पाहून ज्यांनी व्हर्सेलिसचे वैभव पाहिलें आहे त्यांचेहि नेत्र दिपत एकाद्या मोगल : सुभेदाराच्या हाताखाली फ्रान्सच्या राजापेक्षां, जर्मनीच्या बादशहा पेक्षां जास्त प्रजा असे. व सुभेदारांच्या हाताखालच्या सरदारांच्या ताब्यांतहि टस्कनीचा ड्यूक किंवा सक्सनीचा इलेक्टर यांच्या बरोबरीचा उत्पन्नाचा प्रदेश असे. "

 इंग्रजांचें हिंदुस्थानांत आगमन होण्याचे वेळीं हिंदू व मुसलमान संस्कृतीचं संम्मीलन झाल्यावर हिंदुस्थानची जी स्थिति होती तिचें संक्षि वर्णन 'Colonies and dependencies' या पुस्तकाच्या ग्रंथकाराने खालील- प्रमाणें दिलें आहे:-

 "प्राचीन काळी ग्रीक, अरब व इटालियन यात्रेकरू हिंदुस्थानांत देत.. ते सर्व हिंदुस्थानांतील परिणत संस्कृति पाहून चकित होऊन जात. गजबजलेली शहरें, अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली शेती, कलाकौशल्य, तयार केलेल्या नानाविध चिजा, प्रचंड व्यापार, सुंदर इमारती ह्या सर्व गोष्टी हिंदी संस्कृती- या निदर्शक होत ! गतकाली इजिप्त किंवा बाबिलोनमध्ये शकडो वर्षांच्या संस्कारानें ज्याप्रमाणें एकप्रकारचें सामाजिक संघटन उत्पन्न झालें होतें । त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतहि होतें. त्या वेळीं सामाजिक आयुष्यक्रम आजच्या- पेक्षां विविध असे. निरनिराळी राज्य म्हणजे, लोकांना आपल्या उच्च महत्त्वा कांक्षा पूर्ण करावयाची ठिकाणेच होतीं. जीवित सुखकर असून कलाकौशल्या- ची अभिवृद्धि झाली होती. मोठमोठ्या शहरांत कारागीर रहात व ते आपल्या कौशल्यांत इतके निपुण होते कीं, त्यांच्या कौशल्याबद्दल आज आपणांस asia बोटच घालावें लागतें. व्यापारी व सावकार यांच्याजवळ ,अगणित संपत्ति असे. देशांत जर अशांति असती तर इतक्या अलोट धनाचा त्यांना संग्रहच करतां आला नसता. १८ व्या शतकांत सुरत ही युरोपियन व्यापाऱ्यांची जंगी पेठ होती. त्या वेळची तेथील लोकसंख्येची गणति चार लक्षांपासून आठ लक्षांपर्यंत करतात. बंगालची राजधानी मुर्शिदाबाद येथे . सन १७५७ मध्यें क्लाइव्ह शिरला. तो लिहितो, हें नगर लंडनइतकें मोठें,गजबजलेलें व संपन्न आहे. फरक इतकाच कीं, लंडनपेक्षां येथील लोक