पान:इतिहास-विहार.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१७५

७० ठिकाणी ग्रंथालये उघडली गेलीं.युरोपांत कृष्ण-युग सुरू होईपर्यंत म्हणजे सुमारे ५०० वर्षेपर्यंत सारखा अरबी विद्येचा प्रसार होत होता.

 आतां आपण हिंदुस्थानांतील मुसलमानांकडे वळू या ! महमद गझनीनें हिंदुस्थानावर स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करून सोमनाथापर्यंत मुलूख आक्रमण केला व अलोट संपत्ति लुटून नेली; अल्लाउद्दीनानें हिंदुस्थानांत मोठमोठे विजय संपादन केले; अगर शिकंदर लोदी यांचा कारभार अत्यंत सुखकर · असे, या गोष्टीचें वर्णन दिलें नाहीं तरी त्याचा उल्लेख हा केलाच पाहिजे. तैमूरच्या मोगलघराण्यापर्यंत आलों म्हणजे मात्र एकापेक्षां एक विलक्षण • राज्यकर्ते दिसतात. मि. सिडने ओवेन हा आपल्या 'India on the eve .. of British Conquest" ह्या पुस्तकांत लिहितो, "या मोगल घराण्यांत एकापेक्षां एक वरचढ असे लागोपाठ सहा राजपुरुष होऊन गेले. त्यांतील पहिला मोगल साम्राज्यसंस्थापक वायर व तिसरा अकबर यानें तर साम्राज्या- · चा पुनरुद्धार करून त्याचा विस्तार केला व त्यानें अशीं युद्धे केलीं कीं, त्याची तुलना चार्लस भी ग्रेटशीं करतां येईल. शिवाय त्याने लष्करी पद्धतीत पुनर्रचना केली. सहावा बादशहा अलमगीर, हा आपल्या तरुणपणापासूनच मोठा लढवय्या असून आपल्या आयुष्याची शेवटच तेवीस वर्षे एका दीर्घकालीन : युद्धांत घालवून युद्धाचा शेवट न होतांच जर्जर होऊन वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्युमुखी पडला." पाश्चात्य लेखकांनी अकबराची जितकी स्तुति केली आहे तितकी कोणत्याहि पौर्वात्य · राजाची केलेली नाहीं. अकबर या स्तुतीस पात्रहि होता. अकबराने राजकार्यात जी योग्यता दाखविली आहे त्याचें विस्तृत वर्णन करण्याची आतां आवश्यकता नाहीं. पण जातां जातां एवढे सांगितले पाहिजे कीं, त्याची वसुलीपद्धत, जमीन मोजण्याची रीति, लोकसंरक्षणाची त्याची योजना, लोकमताला तो देत असलेला मान व त्याची धार्मिक सहिष्णुता या गुणांमुळे त्याचे समकालीन त्याजवर प्रेम करीत .: करीत व त्याच्या मागचे लोक त्याच स्तुतिस्तोत्रे गात आहेत. त्याच्या अर्थशास्त्रपारंगततेबद्दल 'आयने अकबरी' हा ग्रंथ मूर्तिमंत उदाहरण आहे. - जहांगीरचा मेहुणा अशाफरखान याने इंग्रज वकील टेरी याला एक मेज- बानी दिली, तिचे विस्तृत वर्णन त्यानें केलें आहे. तें पाहिलें म्हणजे, उच्च

के.१२