पान:इतिहास-विहार.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
केळकरांचे लेख

 अरबांची संस्कृति त्यांच्या शौर्याहून कमी नव्हती. स्पेनमध्यें स्यांच्या कलेचीं व विद्याभिलाषाच स्मृतिचिन्हें अद्यापहि दृष्टीस पडतात. त्यांची बरोबरी आजकालचे युरोपियन जेतेहि करूं शकत नाहींत. कार- डोव्हा व बगदाद येथील विश्वविद्यालयांची आठवण आजहि विद्याभिलाषी लोकांना होत आहे. कारडोव्हा येथे ६०० मशिदी, ९०० स्नानगृहें व २००००० निवासस्थाने होती. स्पेनच्या मुसलमान राजांनी केलेले कायदे पहिल्या प्रतीच्या ८० नगरांत, व दुसऱ्या, तिसन्या प्रतीच्या ३०० शहरा- तून चालतं. त्या काळी लोक अत्यंत संपन्न, धनवान् असून, पुष्कळ लोक शेती करीत. स्पेनच्या ज्या लोकांनीं, प्रजा अगर गुलाम या पेशानें 'मुसलमानी धर्म स्वीकारिला, ते ताबडतोब स्वतंत्र होऊन, राज्यकर्त्या मुसल- मानांच्या बरोबरीचे होत. बगदादच्या खलिफाचे वर्णन इतिहास- कारांनी अत्यंत सुंदर केलेलें आहे. बगदादला शांतिनगर म्हणत. बगदाद- च्या खलिफाच्या दरबारची जागा सोन्यामोत्यांनी मढविलेली होती. इमारतींना स्पॅनिश, आफ्रिकन, ग्रीक वगैरे विविध ठिकाणचे आणि रंगांचे सुंदर संगमरवरी दगड जडविले होते. खलिफांच्या उद्यानांत हजारों कारंजी असून त्यांतील एक तर शुद्ध पान्यानेंच भरलेलें असे. विद्यालयांना . अत्यंत उदार हस्तानें देणग्या मिळत. सुलतानाच्या एका वजिराने बगदाद- मध्ये एक विद्यामंदिर स्थापण्यासाठी दोन लक्ष सुवर्णमुद्रा देऊन, वार्षिक देणगी पन्नास हजार दिनारांची दिली होती. एकाद्या अमिराच्या मुलापासून तो तहत, एकाद्या कारागिराच्या मुलापर्यंत सर्वांना सारखें - शिक्षण मिळे; व अशा रीतीने सहा हजार विद्यार्थ्यांना विद्यादान केलें जाई. गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी छात्रवृत्ति ठेवल्या असून, शिक्षकांनाहि * आपले गुण व श्रम यांच्या प्रमाणानं वेतन मिळे. इजिप्तच्या बादशाही ग्रंथालयांत उत्कृष्ट लिहिलेले व सुंदर बांधणीचे एक लक्ष ग्रंथ असून, कैरो येथील विद्यार्थ्यांना त्यांचा फार उपयोग होई. परंतु स्पेनमधील उमरावांनी - स्थापन केलेल्या ग्रंथालयापेक्षां, हा संग्रह छोटा वाटेल, कारण त्या संग्रहालयांत, सहा लक्ष ग्रंथ असून त्यांपैकी ४४ ग्रंथ संग्रहालयांतील "ग्रंथांच्या सूची अथवा याद्या होत्या, त्यांची राजधानी कारडोव्हा, व आस- पासच्या शहरी ३०० वर ग्रंथकार निर्माण झाले व एडॉलुसिअन राज्यांत