पान:इतिहास-विहार.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार

१५

अधिक सुंदर आहे. सर्व बाडा तुळतुळीत दिसतो. बाजीराव विशेष प्रसंगाशिवाय येथे येत नसल्यामुळे अव्यवस्था दिसते. एका सुंदर दालनांत मार्किस वेल्स्लीची उभी तसवीर टांगलेली आहे. दोन मोठे रंगीत ग्लोब (खगोल, भूगोल ) जवळच होते. त्यावर लॅटिन अक्षरें लिहिलेली असून क्षितिजें दाखविणाऱ्या पट्ट्या रुपयाच्या होत्या. १७८८ च्या पूत्र इंग्लंडच्या राजानें पेशव्यांना हे ग्लोब नजर केले होते, गणपतीच्या दिवाणखान्याचें लांकडी छत गोल आहे. दालन सुमारे ५० फूट लांब क खूप उंच आहे. उंचावर चौफेर गॅलरी आहे. ही इमारत आरसेमय: आहे. इंग्रजी बिलोरी झुंबरें पुष्कळ आहेत. सर्व शोभिवंत वस्तूंना गदरुण्या घातल्या. होत्या. वाडयांत एक मोठे. इंग्रजी घडयाळ होते ते. मात्र. बरोबर चाललें होतें.!. चित्रांची अनेक इंग्रजी पुस्तकें होती. जवळच एक खगोलयंत्र मोडून पडलें होतें. त्यांत सूर्यग्रहमाला वगैरे यथाप्रमाण गोल्कांनी दाखविली होती. देशी नक्षीवाल्यांनी काढलेला एक नकाशा होता. पण बापू गोखल्या- जवळ यापेक्षां अधिक चांगला नकाशा असावा, कारण त्याशिवाय इतके दिवस को. आम्हांला, झुकांडी देऊन कसा पळू शकतो!"

 वरील वर्णनानंतर शंभर वर्षांनी या वाडयाची राख सावडली जाऊन आज त्याचे नुसते अस्थिरूप पाये लोकांना दिसत आहेत, पण आतां सर्वच मनु पालटला असून जुनी पेशवाई तर गेलीच, पण त्यानंतरच्या इंग्रजी नोकरशाहीचे हि दिवस भरत आले आहेत.. अठराव्या शतकाच्या विशीत बांधलेल्या, एकोणिसाव्या शतकाच्या विशींत नाश पावलेल्या, क विसाव्या शतकाच्या विशीत पाये. उकरून काढलेल्या या वाडचाला एक विसाव्या शतकाच्या विशींत काय दिसणार आहे तें परमेश्वराला माहीत !