पान:इतिहास-विहार.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
केळकरांचे लेख.

इंद्रधनुष्याची देखावा दिसावा अशी योजना असल्याचे कित्येकांना वाटतें. गणेश दरवाजाजवळील खजिन्यांतून पाणी निघालें म्हणजे तें अनेक नळांनीं हौदांत पडून किंवा एका हौदांतून दुसऱ्या हौदांत जाऊन सांडपाण्यासह अखेर पश्चिम अंगास बांधलेल्या पक्कया नहरांतून नदीला नेऊन मिळविलें होते. वाड्यांतील बहुतेक नळ तांब्याचे असून ते गंजू नयेत म्हणून त्यांच्या अंगाबरोबर राळ, त्यावर खादी; त्यावर ताग व त्यांवरः चुना अशा बंदो- बस्ताने ते झांकून जमिनींत गाडलेले आहेत.

 शनिवारवाड्याचें वर्णन परकीयांनी केलेले क्वचित् आढळते. एकाः मुसलमान सरदाराच्या पत्रांत हैं. वर्णन अवघ्या दोन वाक्यांत केलें आहे तें असें – “ बाहेरून पाहतां हा वाडा नरकासारखा दिसतो व आंत स्वर्गा- "सारखा दिसतो." : पारस निसांच्या इतिहाससंग्रहांत साहेब लोकांनी केलेल्या या वाड्याच्या वर्णनाचे एकदोन उतारे आहेत. सन १७९१ साली सर चार्लस मॅलेट यांजबरोबर मेजर प्राइस हा वाड्यांत गेला होता. त्याच्याः उल्लेखांतून खालील वाक्य घेतले आहे. "वाड्यांतील दिवाणखाना खूप प्रशस्त व जंगी होता; पण आंत अत्यंत साधेपणा होता. लांकडांतील खोदीव कामापेक्षां शोभादायक असें त्यांत कांहींएक नव्हतें.. सर्व बैठकी- वर पांढरी शुभ्र चादर एकजात पसरली होती." १८०३ साली लॉर्ड - इलेनशिया त्यानें दुसऱ्या बाजीरावाची गांठ शनिवारवाड्यांत घेतली, त्याच्या वर्णनांतून खालील वाक्यें घेतली आहेत. " आम्ही जिन्याच्या 'तोंडाशी पालख्यांतून उतरलों. वर चढून गेल्यावर एका लहानशा खोलींतून 'दरबारच्या दिवाणखान्यांत प्रवेश केला: आम्ही जाऊन थोडा वेळ उभे राहिल्यावर पेशवे येऊन गादीवर बसले. * * * हा वाड़ा सामान्यरीत्या सुंदर आहे. मात्र तो अत्यंत स्वच्छ दिसतो. दरबारचा दिवाणखाना फार मोठा आहे. लांकडी खांबावर सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे.". १८१८ - कर्नल फिट्स लरेन्स यानें दुय्यम रेसिडेंट, मि० कोटस् याचेबरोबर जाऊन वाडा पाहिला. या वेळी पेशव्यांची वस्ती वाड्यांतून उठली होती... तो म्हणतो " *** आंतील चौकाच्या भिंतींवर, पौराणिक देवता, - हत्ती, घोडेस्वार वगैरेंची बेडींबांकडी बरीच चित्रे काढलेलीं आहेत... चाड्यांतील मोठा चौक, नागपूरकर भोसल्यांच्या वाड्यांच्या चौकापक्षां