पान:इतिहास-विहार.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
केळकरांचे लेख

बिनधोक्याचा व नजीकचा मार्ग नव्हता तरी, सर्वोचे पाय हिंदुस्थानाकडेच बळत. युरोपियन व्यापाऱ्यांना भूमध्यसमुद्रावरील व्यापाऱ्यांकडून हिंदुस्थान- ची कीर्ति समजली व ते हिंदुस्थानांत प्रत्यक्ष आल्यावर त्यांचा अनुभव तंतोतंत खरा ठरला. सन ७७ व थोरला हिनी याची कुरकुर होती कीं, प्रतिवर्षी रोमन साम्राज्यांतून, हिंदुस्थानांत, अरबस्थानांत व चीनमध्ये कमत कमी १० कोटि सेस्टोरिया (तत्कालीन चांदीचें नाणें ) किंमतीचें सोनें जाई व त्याच्या बदला जो माल परत येई तो त्याच्या मूळ किंमतीच्या शंभर पटीने विकत असत. सत्राव्या शतकांत बर्नियरनेंहि याच प्रकारचें वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, 'हिंदुस्थान हा असा एक प्रचंड वडवानल आहे की, त्याच्यांत अनेक मार्गांनी सोनेंचांदी जाऊन पडते, परंतु त्यांतून परत मात्र कांहीं येत नाहीं. टॅव्हर्नियरनें हिंदुस्थानांत तयार झालेल्या मालाबद्दल लिहितांना, फक्त कासीमबझारचें वर्णन दिले आहे. तो म्हणतो, 'बंगालमधील या गांवांतून, २२ लक्ष पौंड वजनाच्या २२ हज़ार रेशमाच्या गांठीं बाहेर देशी जातात'. सोन्याचांदीच्या कलाबतूचें काम केलेले रेशमाचे गालिचे व अत्यंत सुंदर अशा शेंकडों वस्तु हिंदुस्थानांत तयार होत असत. डाका येथील भलमल तर इतकी अप्रतिम बनत असे की, कित्येक वेळा ती सोन्याच्या भावाने विकली जाई.

 हिंदी चित्रकलेसंबंधानें एवढे सांगितले असतां पुरें कीं, कुशल हिंदी चित्रकारांनी काढलेले चित्रकलेचे कांही उत्कृष्ट नमुने हिंदी अजबखान्यांतून आज सरकारने जपून ठेवले आहेत व ते अमूल्य समजले जातात. दक्षिण हिंदुस्थानांतील भव्य इमारती व मध्य हिंदुस्थानांतील कोरीव लेणी पाहिली म्हणजे भारतीय कलेचें शुद्ध स्वरूप लक्षांत येतें.

 शेवटी १९ व्या शतकांतील एकदोन ब्रिटिश मुत्सद्यांचें हिंदुसंस्कृती- बद्दल मत नमूद करणें जरूर आहे. हिंदुसंस्कृतीबद्दल सर टॉमस मनरो यानें पुढील उद्गार काढले आहेतः- "हिंदुसंस्कृति याचा अर्थ काय हैं मला समजत नाहीं. भिन्न भिन्न प्रकारचें उच्च शास्त्रीय शान, राज्यशासनपद्धति, दुराग्रह आणि अंधविश्वास सोडून सर्वप्रकारचें व सर्व ठिकाणचें ज्ञान संपादन करणें, या बाबतींत हिंदी लोक युरोपियन लोकांहून कमी प्रतीचे आहेत. परंतु उत्कृष्ट शेतीची पद्धत, शिल्पकामांत अनुपमेय हुशारी, ऐष