पान:इतिहास-विहार.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१७१

विधानास मात्र बिलकूल आधार नाहीं. हिंदुस्थानसरकारचे शेतकीरसायन- शास्त्रश डॉ० वोलकर यांनी नमूद करून ठेवलें आहे की, "हिंदुस्थानच्या शेतीसंबंधानें इंग्लंडमध्ये अशा कल्पना पसरल्या आहेत की; हिंदी शेती . अगदीं मागसलेली आहे; परंतु ही गोष्ट मात्र अगदी असत्य आहे. हिंदी शेतकरी ब्रिटिश शेतकऱ्याच्या बरोबरीचा आहे. एवढेच नव्हे तर कित्येक बाबतीत पुढे गेलेला आहे. त्याला प्रतिकूल गोष्ट ही की, त्यांची ही स्थिति सुधारण्यास आवश्यक अशी साधनें तेथें मुळींच नाहींत. जगांत अशी स्थिति दुसरीकडे कोठेंहि नाहीं, त्यामुळे शेतकरी मुकाट्याने येतील त्या संकटांशी धिमेपणानें झगडतो. त्याच्याइतका धिमा सहनशील मनुष्य दुसरा सांपडणे कठीण! शेतीची साधीं कामें घ्या. जमिनीची मेहनत मश- गत करणं, जमिनींत झाडूर वाढू न देतां ती अगदी साफ ठेवणें या कामी हिंदी शेतक-याच्या बरोबरीला कोणी हे लागणार नाहीं, पाणी वर काढण्याच्या युक्त्या, जमिनीच्या गुणधर्माबद्दल त्याला असलेले ज्ञान, पेरणी- कापणीच्या हंगामाच्या वेळा जाणणे, वगैरे आवश्यक गोष्टींत त्याचा हात कोणी धरू शकणार नाहीं. निरनिराळ्या प्रकारची धान्यें एकत्र उत्पन्न करण्याच्या त्याच्या ज्ञानाबद्दल तर आश्चर्य वाटते, मी माझा मुक्काम पडे त्या ठिकाणच्या आसपास असे पाहिलें आहे कीं, अभान्तपरिश्रम, कामाबद्दल निदिध्यास, यामुळे हिंदी शेतीइतकी सुधारलेली शेती दुसरीकडे- कोठेहि माझ्या पाहण्यांत आलेली नाही.

 त्यामुळे खाण्याची मुख्य मुख्य धान्यें हिंदुस्थानांतच पिकतात. हिंदुस्थान हैं, परदेशांचे धान्याचे कोठारच होऊन बसले आहे. व्यापाराच्या बाबतींतहि हिंदुस्थानचें महत्त्व फार आहे. हिंदुस्थानच्या प्राचीन व अर्वा- चीन आर्थिक स्थितीची तुलना करणें हा विषयच असा आहे कीं, आपले लक्ष सहजच तिकडे ओढले जाते. इंग्रज लोकांनी हिंदुस्थानांत पाय ठेवला त्या वेळीं, हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति कशी होती, हें सांगणे आवश्यक आहे युरोपियन लोकांत लांबलांबचीं समुद्रपर्यटने करण्याचें साहस उत्पन्न झाले त्या वेळेपासून, युरोपियन व्यापारी मोठ्या संकटांचीं जलपर्यटनें करून येथे येऊ लागले. या गोष्टीवरूनच सतराव्या शतकांत, हिंदुस्थानांत संपत्ति कशा प्रकारची होती याबद्दल वेगळे सांगण्याची जरूरी नाहीं.