पान:इतिहास-विहार.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
केळकरांचे लेख

त्यांत पुरापासून अगर दलदलीपासून बचाव व्हावा म्हणून मोठाले बांध घालीत असल्याचा उल्लेख आहे. मि० व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो:-

 साम्राज्याच्या फार दूर प्रदेशांतहि जमिनीला पाण्याचा पुरवठा. व्हावा म्हणून फार परिश्रम घेतले जात, त्यावरून जमिनीला पाण्याचा पुर- वठा करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे असें मौर्य सम्राट् समजत, इजिस- प्रमाणे येथेहि सरकारी अधिकारी जमिनीची मोजणी करून प्रत्येकास त्याच्या वांच्याप्रमाणे पाणी बरोबर मिळत आहे की नाहीं तें पहात, असें मेगॅस्थेनीस म्हणतो."

 ज्यांना हिंदूंच्या औदार्यशीलतेची माहिती आहे, त्यांना प्राचीन काळीं हिंदुस्थानांत धर्मार्थ औषधालयेंहि होतीं याचें आश्चर्य वाटणार नाहीं. मि० व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो :-

 "मुंबई व सुरत येथे र्जी औषधालये होतीं -- कदाचित् अजूनहि असतील ती मौर्य सम्राटांनी स्थापन केलेल्या या संस्थांचे अवशेष किंवा प्रतिरूपेंच आहेत."

 'प्राचीन हिंदुस्थानांत' असा स्पष्ट उल्लेख आहे कीं, राजानें व्यापार- वृद्धीविषय काळजी घेतली पाहिजे. दुधदुभतें, गुरांची वाढ, खाणी, 'घातूंचे कारखाने याबद्दलहि उल्लेख सांपडतो.मीठ तयार करणें व दारू गाळणे यांबद्दल सरकारी परवानगी लागे.नौकानयन - नौका बांधणें- या कलेची फारच अभिवृद्धि झालेली होती.परंतु या विषयाबद्दल आपण बाबू राधाकुमुद मुकर्जी यांच्या 'नौकानयन' या सुंदर पुस्तकाचा नाम- निर्देश केला असतां पुष्कळ होईल.


  सूत कांतर्फे व कापड विणणे ही कला हिंदुस्थानांत इतकी पूर्णत्वाला गेली होती की, जगांत तिला तोडच नव्हती. या कलेला राजाश्रय व उत्तेजन असे. आजकाल असें म्हटलें जातें कीं, हिंदुस्थान हा देश कृषिप्रधान आहे व तसा असर्णेच योग्य आहे; परंतु प्राचीन काळीं मात्र तशी स्थिति नव्हती. एक गोष्ट निर्विवाद आहे की, शेतकी हा एक प्रमुख चंदा होता, व आजच्याइतकें शेतकीशास्त्र जरी पुढे गेलेले नसलें तरी, तत्कालीन साधनसामुग्रीच्या मानानें, त्या धंद्याचीहि शक्य तेवढी प्रगति झालेली होती. परंतु हिंदी शेतकी अगर्दी अव्यवस्थित, अशास्त्र होती, या