पान:इतिहास-विहार.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१६९

३॥ मैल लांब व पाऊण मैल रुंदं होतें, त्याच्या सभोवती खंदक व चांगले मजबूत बुरूज होते. तेथील सरोवरांचें, तलावांचे पाणी स्फटिकाप्रमाणें स्वच्छ व तेजस्वी असून त्यांच्यांत पडलेल्या लतापुष्पांच्या प्रतिबिंबांमुळे तर फारच मनोहर दिसत असे. फार मौल्यवान् पदार्थांची देवघेव तेथें चालें, त्यामुळें, तेथे सर्व ठिकाणचा माल येत असे. लोक अत्यंत सुखी व संतुष्ट असून त्यांची निवासस्थानें फारच रमणीय असत, फलपुष्पांची तर येथें समृद्धि होती."

 पंधराव्या शतकांतील इटालियन व पोर्तुगीज प्रवाशांनी विजयानगरचे वर्णन केले आहे तेंहि इतकेंच मोहक आहे. प्रत्यक्ष पाहणारांनी त्या नगराचे असे वर्णन केलें आहे कीं, त्या नगरचा विस्तार ६० मैल होता. व किमान पक्ष ९०००० वीर युद्धास केव्हांहि सूज असत. मद्रास इलाख्यांतील हॉसपेट येथील भमावशेषावरून त्याच्या गतवैभवाची कल्पना होईल.

 मि० व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो, " अशोकाचे वेळीं, वास्तुविद्या उच्चावस्थे-. प्रत पोहोंचली होती यांत शंका नाहीं. त्याबरोबर नक्षी वगैरे कलाकुसरीचें कामहि पूर्णत्वाला गेलें होतें. मोठमोठ्या इमारतींवर नाना प्रकारच्या वेल पत्त्या वगैरे सुंदर नक्षीकाम कोरून त्या शोभिवंत करीत, मनुष्यांचे व पशुपक्ष्यांचे पुतळेही फार सुबक होत. "

 याशिवाय पब्लिक वर्क्सच्या लोकोपयोगी कामांची पुष्कळ अभिवृद्धि झाली होती. ४८ फूट रुंदीचे रस्ते असल्याचीं बरोबर वर्णन आज मिळत. आहेत. रस्त्यांचें अंतर व फूट, ठिकठिकाणी उभे केलेले रस्ता दर्शविणारे दगड, मेगॅस्थिनिसने पाहिलेले होते. अशोकाच्या लेखांत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, प्रवासी व यात्रेकरू यांच्या आरामासाठी विश्रान्तिस्थळे. बांधणे वगैरेबद्दल उल्लेख आहे. पूल बांधण्याची कला त्या वेळीं बाल्या- वस्येंत होती. परंतु लहान नद्या, ओढे यांजवर छोटेखानी पूल केले असून मोठाल्या प्रवाहांवर नावांचे पूल उभारलेले असत. मोठमोठे बंधारे बांधून, जमिनीला पाणी पुरविण्याचा प्रघात त्या वेळी होता. व जे लोक नवीन तळी बांधीत अगर जुनी दुरुस्त करीत त्यांना साभ्याची थोडीबहुत सूटहि मिळे, राजतरंगिणी हा ग्रंथ काव्यापेक्षां ऐतिहासिक महत्त्वाचाच जास्त आहे.