पान:इतिहास-विहार.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
केळकरांचे लेख

तयार केले होते. त्या मंडळांत, युद्धमंडळाप्रमाणे पांच पांच गृहस्थांचें एक मंडळ अशी सहा पोटमंडळे असत. फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत, जातिजातींच्या पंचायती असत. त्यामुळे प्रत्येक जातीस व व्यापारीवर्गास आपले हितसंबंध पाहण्याची संवय असे; त्याचेंच पूर्ण स्वरूप म्हणजे, ही मंडळें होत. "

 "म्युनिसिपल बोर्डाकडे उद्योग व कलाकौशल्य यांजवर देखरेख करण्याचे काम सोपविलें असे. अर्थात् मजुरीचा निरख ठरविणें वगैरेबद्दल ते जबाबदार असत."

 "दुसऱ्या मंडळाकडे, विदेशीय पाहुण्यांसंबंधी सर्व व्यवस्था असे. यामुळे परकीय लोकांवर चांगली नजर राहून, त्यांच्या राहण्याची, औषध- पाण्यांची, वगैरे सर्व व्यवस्था लागे... ..ह्या नियमांवरून ही गोष्ट सिद्ध होते कीं, ख्रिस्तीशकापूर्वी तिसऱ्या शतकांत मौर्य साम्राज्याचें परदेशाशीं संतत दळणवळण सुरू असे, "

 " तिसऱ्या मंडळाकडे, जन्ममृत्यूची पद्धतशीर नोंद ठेवण्याचें काम असे. ही नोंदणीची व्यवस्था, सरकारी माहितीसाठी व कर वगैरे बस- विण्यासाठी, मुद्दाम सुरू केली होती. अँग्लो-इंडियन राज्यव्यवस्थेत कितीहि संस्था निघाल्या असल्या, त्यांच्या आंकडेशास्त्राच्या युक्त्या कितीहि पुढे गेलेल्या असल्या तरी अगदी अलीकडील काळापर्यंत असे आंकडे मिळ- विण्याचा प्रयत्न केलेला नाही, व बिनचूक संख्या मिळविण्याच्या कामांत कोणीहि इतका त्रास सोसला नाहीं."

 आज पब्लिक वर्क्स या नांवानें ओळखले जाणारें खातें पूर्वकाल हिंदु लोकांस पूर्ण माहीत होतें. मोठमोठ्या नगरांच्या व शहरांच्या विस्तारानुरूप सार्वजनिक इमारती बांधल्या जात. राजनगरी पाटलीपुत्र खिस्तीशकाच्या पांचव्या शतकांत बसवली गेली. ती ९ मैल लांब व १॥ मैल रुंद होती. तिच्या सभोवताली प्रचंड तटबंदी असून ६४ वेशी व्र ५७० बुरूज होते. सातव्या शतकांतील राजनगरी उज्जयिनी हीहि एवढीच प्रचंड होती. कालिदासानें तिचें केलेले वर्णन, कवीची अतिशयोक्ति म्हणून सोडून दिलें तरी, प्रसिद्ध चिनी प्रवाशानें कनोजच्या या राजधानीचें जें वर्णन केले आहे त्याबद्दल तरी संशय घेण्याचें कारण नाहीं. " है नगर