पान:इतिहास-विहार.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१६५


विक्रमादित्य यांची राज्यपद्धति उत्तम प्रकारची होती. अधिकारीवर्ग प्रजेः च्या कामांत क्वचित् ढवळाढवळ करी. त्यामुळे लोकांस आपल्या इच्छे- नुरूप आपली भरभराट करून घेतां येई. भारतवर्षात विक्रमादित्याचे वेळी- जितकी उत्तम राज्यपद्धति होती, तितकी दुसरी कोणाचीहि नव्हती.' सर कारला कांहीं विशेष करण्याची आवश्यकताच नसे. लोक आपणच सर्व करीत. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यास बाध येत नसे.

 ह्यूएनत्संगच्या अगोदर सुमारें दोन शतकांपूर्वीचा चिनी यात्रेकरू फाहि एन, याच्या मनावर येथील राज्यशासनपद्धतीचा उत्कृष्ट परिणाम झाला होता व येथील राज्यशासनसिद्धान्त' उत्कृष्ट पापावर उभारले आहेत असा त्यांचा ग्रह झाला होता. सरकारी उत्पन्नाची मुख्य बाब जमीन महसुलाची असून, उत्पन्नापैकी भाग सरकागंत आदा करावा में कर अगदी माफक असत.

 अंमलबजावणीसंबंधानें पाहिले असतां, जबाबदार मंत्रिमंडळ निवडण्याचे तव प्राचीन काळापासून मान्य झाले असून प्राचीन शास्त्रकारांनी राजीना नुसतें प्रधानंमंडळ नेमण्याबद्दलच न सांगतां, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्या- चा उपदेश केला आहे. शुक्रनीतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय विभागांचे स्पष्टीकरण दाखविले असून प्रत्येक विभागाच्या अधिकान्यांस पुरोहित, प्रतिनिधि, प्रधान, फडणीस, न्यायाधीश, युद्धमंत्रि, सुमंत अशी नांवे असत. विलक्षण हैं कीं, राजाच्या हातून कांहीं वाईट कर्में होत नाहींत असे मत त्या वेळी प्रचलित असे मुद्राराक्षस या संस्कृत नाटकांत नाटककार म्हणतो:--'"" राजाच्या हातून एकादें वाईट कृत्य झालें तर तो अपराध मंत्र्याचा आहे; कारण महाताच्या हलगर्जीपणामुळेच हत्ती मस्त होतो.!"

 राज्यव्यवस्थेच्या सोईसाठीं जमाखर्च, खजीना, टांकसाळ, खनिज पदार्थ, जंगल, व्यापार, जकात, वजनें, मापें, जहाजे बांधणे, पाटबंधारे विणकाम, अश्वशाला, गोशाला वगैरे वेगवेगळीं खातीं केलीं असून त्या प्रत्येक खात्यावर देखरेख करण्यासाठी एक प्रमुख अधिकारी नेमला जात असे. पोलिसखातें अस्तित्वांत असे, हे वेगळे सांगण्याची कांहीं जरूरी नाही: चोरीस गेलेला माल परत आणून देण्याची जबाबदारी पोलिसचर असे हैं लक्षांत ठेवण्यासारखे आहे. हा पोलिससंबंधी नियम विशेष कडक आहे