पान:इतिहास-विहार.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
केळकरांचे लेख

महाबीर हा एका अल्पजनसत्ताक राज्यांत जन्मला असे विधान केले आहे.. अल्पजनसत्ताक हा राजसत्ता - लोकसत्ता यांजमधील दुबाच आहे.. वैशाली येथे अल्पजनसत्ताक राज्यपद्धति होती व तिचें नियंत्रण क्षत्रियजातींतील पुढान्यांच्या मंडळाच्या हातीं होतें.

 " कांही राज्यांवर राजेलोक राज्य करीत व कांहीं ठिकाण लोकसत्ता होती. उदाहरणार्थ, महाभारतांत वृष्णींनीं असेंच अल्पजनसत्ताक राज्य स्थापिलें होतें. त्यांचे पुष्कळ पुढारी असत. व कृष्ण हाहि त्यांतील एक प्रमुख होता. त्या कार्ली, भारतवर्षात कोणत्या ना कोणत्या रूपानें लोक- तंत्री संख्या अस्तित्वांत होत्या. ही गोष्ट निर्विवाद आहे. "

 'कुमारगुप्त आणि बंधुवर्धन यांच्या मंदेसर येथील शिलालेखावरून, मालव देशांत लोकसत्ताक राज्यपद्धति अंमलांत होती असे दिसतें. "

 अम्बष्ठ लोक ज्या नगरांतून रहात तेथें लोकतंत्री राज्यकारभार चाले. करटिअसने अशाच एका शक्तिसंपन्न जातीचा उल्लेख केलेला आहे. तेथेहि लोकसत्ताक राज्यपद्धतिच रूढ होती. मलोईनीं जेव्हां शिकंदराचे वर्चस्व मान्य केले त्या वेळी त्यांनीं शिकंदरास बजावलें कीं रवराज्य व स्वातंत्र्य यावर आमचें फारच प्रेम असून, हिंदुस्थानांत डायोनियस आल्यापासून अलेक्झांडरच्या स्वारीपर्यंत आम्ही आपल्या स्वातंत्र्याचें संरक्षण केले आहे, "

 " अल्पजनसत्तेचें अत्यंत उत्कृष्ट उदाहरण, लिच्छवीस (Lichavis ) यांचें होतें, त्यांतील सर्व प्रमुखांस राजा ही संज्ञा असे.- ( पी. बानर्जी.)

 भारतीय आर्यामध्ये त्यांच्या युरोपियन बंधूंप्रमाणेच स्वतंत्र राजकीय संस्थांबद्दल उपजत आवड होती. बुद्धांच्या पाली ग्रंथांतून प्रजातंत्री राज्यां- च्या अस्तित्वाबद्दल बरेच उल्लेख आलेले आहेत.

 उपरिनिर्दिष्ट हिंदु राज्यपद्धतीला गोड अशीच फळें आली होती, देशांत कोठेंहि अशांतीचें नांवहि ऐकू येत नसे. सर्वत्र शांति व समाधान यांचेच साम्राज्य होते. अन्याय, सामाजिक तंटे व क्रान्त्या यांचा मागमूस नव्हता, राजांची महत्त्वाकांक्षा प्रबल होऊन, ते आपले सामर्थ्य वृद्धिंगत करण्याची हांव धरूं लागले म्हणजे मात्र देशांत अशांतता माजे. प्राचीन- काळीं, हिंदुस्थानांत आलेल्या चिनी यात्रेकरून जी माहिती मिळवून लिहून ठेविली आहे त्यावरून, निस्संशय असे म्हणतां येतें कीं, चंद्रगुप्त,