पान:इतिहास-विहार.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार

१३

परंतु पाण्याचे हौद, नळांचे काम, उछ्वास व सांडपाण्याच्या निकालाच्या मोऱ्या या पाहतां त्यांच्या रचनेंत मिजासीइतकेंच उपयुक्ततेकडे व टिकाऊ- पणाकडे लक्ष दिलेलें दिसून येते. हल्लीं सर्व शहराकरितां मिळून पाण्यांचा पुरवठा एकच असतो; पण जुन्या काळीं मोठमोठ्या राजेरजवाड्यांप्रमाणें मोठमोठे सरदारहि आपापले पाण्याचे खजिने व नळ वेगळे बांधीत.. पेशव्यांनी आपले पाणी कात्रज येथें तलाव बांधून त्यांतून आणले. याचें काम सन १७२९ सालीं सुरू झाले व तें १७३७ साली पूर्ण झालें. पुढें: तेवीस वर्षांनी मूळचा खापरी नळ काढून दगडी नळ घालण्यांत आला.. नाना फडणविसांनीं नन्हें येथून खजिना व नळ बांधून त्याचे पाणी सदाशिव पेठच्या हौदांत आणून सोडलें तें ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके १७१० रोज असाहि उल्लेख सांपडतो. पाणीपुरवठ्याच्या कामी आजच्या इंजिनिअरां- इतकेंच त्या वेळचे लोक वाकबगार होते असें दिसतें. मुसलमानांचा तर या कामी हातखंडा होता. दिल्ली, विजापूर, औरंगाबाद, अहमदनगर वगैरे ठिकाणी जुने पाण्याचे खजिने व हौद यांची नुसती चैन होती याचा भक्कम पुरावा अद्यापहि मिळतो.

 शनिवारवाड्यांत उकरून काढलेल्या जागेंत लहानमोठी बरीच कारंजी आहेत. पण त्यांतील दोन विशेष चित्ताकर्षक आहेत. पैकी मोठें कारंजें वांड्याच्या मागील चौकांत व हल्लींच्या न्यायकचेरीच्या इमारतीच्या वायव्य :- कोपऱ्याला लागून आहे. तें उत्कृष्ट कमळाकृति असून त्याचा घेर सुमारें ऐशी फूट आहे. त्यांत सोळा पाकळ्या असून दरपाकळींत सोळा लहान कारंजी मिळून १९६ कारंजी उडत होती. एवढें कारंजे किंवा अशा घाटाचे कारंजें हिंदुस्थानांत कोणत्याहि इमारतींत आढळत नाहीं असे. सरकारी संशोधक खात्याचें मत दिसतें. टाइम्सच्या बातमीदारानें " याचे नुकतेच वर्णन केलें त्यांत तो म्हणतो की, एका रोम शहरा- खेरीज जगांत इतर कोठेंहि इतक्या तोट्यांचे कारंजें नाहीं; मग हें कितपत खरे असेल तें असो. वाड्यांच्या पूर्वांगास निघालेले हौदहि प्रेक्ष- णीय आहेत. एका हौदांत चार भिंतींना कोनाडे ठेवलेले असून चार बाजूंनी पाण्याचे रुंद पातळ प्रवाह पडावे व या कोनाड्यांतून ठेवलेल्या रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाने या कृत्रिम धवधब्यांवर अंधाऱ्या रात्री