पान:इतिहास-विहार.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१६३

सत्ता असे व तो आपल्या प्रजेच्या हिताबद्दल अगदी बेफिकीर असे असे मानणे कीच होईल. कारण राजाच्या हाती कायदे करण्याची सत्ता नव्हती है लक्षांत ठेविले पाहिजे, देशांतील विद्वान् पंडित व जातीतील प्रमुख लोक. आपल्या रीतिरिवाजांस अनुसरून असे कायदे करीत, राजाने फक्त त्यांची अंमलबजावणी करावयाची असे. तात्पर्य, तो कायदे करणारा नसून त्याची बजावणी करणारा मुख्य शास्ता होता. याचप्रमाणे राज्यव्यवस्था व वसुली या बाबतींतहि त्याचे हक्क अत्यंत नियंत्रित असत. कारण राज्यांतील ग्राम-" पंचायती, भिन्न भिन्न जाति व व्यापारीवर्ग आपल्या रीतिरिवाजांस अनुकूल अशा पद्धतीने कायद्यांची बजावणी करण्याबद्दल आग्रह धरीत. "

 एकमुखी राजसत्ताक राज्यपद्धतीच हिंदूंना माहीत होती असे नाहीं. येथे प्राचीन काळापासून अल्पजनसंत्ताक व बहुजनसत्ताक राज्य-पद्धति रूढ़ होती, अशाबद्दल मि० न्द्रीस डेव्हीस, सि० व्हिन्सेन्ट स्मिथ, डॉ० सर भांडारकर, मक्किंडल वगैरेंचा भरपूर पुरावा आहे याबद्दल त्यांच्या ग्रंथांतील कांहीं उतारे खाली देऊ.

 " कपिलवस्तु येथे शाक्य लोक आपला राज्यकारभार व न्यायाचें काम संथागार नामक एका सार्वजनिक दिवाणखान्यांत करीत त्या वेळीं वृद्ध - तरुण सर्व लोक तेथे हजर असत. अधिवेशनप्रसंगीं, अगर अधिवेशन नसेल तर राज्यकाजासाठीं, एक मुख्य अधिकारी निवडला जाई व तो राजा ही पदवी धारण करी; ही पदवी रोमन कौन्सल किंवा ग्रीक आरकान याला समानार्थी आहे. "

 प्राचीन बुद्ध-लेखांवरून असे सिद्ध झाले आहे की, सामर्थ्यवान् एक- तंत्री राजांच्या राज्याबरोबरीचीं लोकतंत्री राज्यहि होतीं व तीं स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घेत असत. या बुद्धलेखांना त्यानंतरच्या जैन-लेखांनी पुष्टि दिली असल्याने त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल शंका घेण्याचें कारण नाहीं. ( दस डेव्हिस . )

 पंजाब, पूर्वराजपुताना व माळव्यांतील बहुतेक भाग अशा प्रजासत्ताक संस्थांच्याच ताब्यांत होता.

 सन १८९८ मध्ये बंगाल अंशिएटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ॰ होर्नूल यांनी जैनधर्मावर व्याख्यान दिले. त्यांत त्यांनी जैनधर्माचा संस्थापक