पान:इतिहास-विहार.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
केळकरांचे लेख

चार विभाग मानले जात असत. परंतु चंद्रगुप्तानें आपल्या असाधारण बुद्धिमत्तेनुरूप आरमारी व पुरवठा अशीं दोन खाती जास्त जोडली. त्या सर्वांची व्यवस्थाहि उत्तम ठेविली जात होती. प्लुटार्क त्याबद्दल लिहितोः "चंद्रगुप्ताने या सेनेच्या साहाय्यानें सर्व हिंदुस्थान पादाक्रान्त केलें एवढेच नाही, तर त्यानें मॅसिडोनियाची फौज हांकून देऊन, सेल्युकसची मोहीम "निष्फळ केली. "

 हिंदूंच्या राज्यशासनाच्या नियमांबद्दल बाबू प्रमथनाथ बानर्जी यांच्या ( Publie administration in ancient India ) पुस्तकांत विस्तृत विवेचन केले आहे, तें वाचकांनी पहावें अशी आमची शिफारस आहे. त्या पुस्तकात ते लिहितात, "वैदिक काळारंभी समाजरचना अगदी साधी असून समाजात जातिभेद बिलकुल नव्हता, व प्रत्येकजण समान दर्जाचाच .मानला जाई. कुटुंबव्यवस्थेत, कुटुंबांतील वडील मनुष्य हाच प्रमुख समजला जात असे; परंतु आर्य पिता हा आपल्या कुटुंबाचा सर्वस्वी मालक नसे व रोमन पित्याप्रमाणे आपल्या ताब्यांतील लोकांच्या प्राणावर त्याचा अधिकार नसे. पाश्चात्य देशांत ज्या प्रकारची गुलामगिरी होती त्या प्रकारची गुलाम- गिरी येथे जव्हती. मगस्थेनीस यानेंहि "हिंदु लोक गुलाम बाळगीत नसतं' "अशी ग्वाही दिली आहे. ग्रामव्यवस्थेचीं कामें ग्रामपंचायतीच्या मार्फत चालत व सर्व लोकांचे हित अनहित एकच असल्यामुळें, सर्व कुटुंबे एकाच सूत्रांत संबद्ध झालेली असत, प्राचीन काळीं, लोक राजशासनसत्ता- " मानीत होते. परंतु कित्येक पाश्चात्य लेखक म्हणतात, त्याप्रमाणें हिंदु लोकं. राजास देवाचा अंश मानीत, ही गोष्ट मात्र निराधार आहे. कारण जनतेनें राजाला केंव्हांहि धर्माधिपति मानलेला नाहीं. राज्यशासनाचा उद्देश मोक्ष- 'प्राप्ति नसून राजकीय व सामाजिक कल्याण करणे हाच केवळ असे. धर्म व कायदा यांत त्या वेळी आजच्या इतका स्पष्ट भेद दाखविला नसला, तरी राजा हाच मुख्य शास्ता असून कायद्यांची फक्त अंमलबजावणी ' करण्याचे काम त्याजवर सोपविलेले असे, प्रजेचें राजकीय महत्त्व अगदी 'स्वतंत्र असून, धार्मिक आचारांशी राजांचा कांही संबंध नसे. मनुष्याच्या व्यक्तिगत हक्कांपेक्षां त्याच्या सामाजिक हक्कांना जास्त प्राधान्य दिले जाई. कित्येक युरोपिअन लेखक म्हणतात, त्याप्रमाणे राजाच्या हातीं अनियंत्रित