पान:इतिहास-विहार.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१६१

 " चौथ्या शतकामध्ये उत्तर हिंदुस्थानांतील सर्व सुपीक व लोकवस्तीचा मुलूख समुद्रगुप्ताच्या ताब्यांत होता. पूर्वेस हुगळी व पश्चिमेस चत्रळपर्यंत त्याचा राज्यविस्तार असून उत्तरेस हिमालयांच्या पायथ्यापासून तो दक्षिणेस नर्मदेपर्यंत ते पसरलें होतें. सहावें शतकांपूर्वी अशोकाच्या छत्राखाली जेवढे साम्राज्य होतें. त्याच्याहून समुद्रगुप्ताचें साम्राज्य किती तरी मोठें होतें व म्हणून स्वाभाविकच त्याला समुद्रगुप्त असें नांव पडलें होतें. गांधार आणि काबूलचा राजा कुशान, आक्ससचा राजा, आणि सीलोन व इतर दूरस्थ द्वीपे यांच्याशीं त्याचा राजकीय संबंध होता. "


 अशा प्रकारचीं प्रचंड राज्ये सैनिकबलाशिवाय जिंकलींहि जात नाहींतव संरक्षिलींहि जात नाहींत, व म्हणूनच प्राचीन हिंदुराजांजवळ प्रचंड शौर्यशालिनी सेना होती असें जर कोणी सांगितलें तर त्याबद्दल आपणांस आश्चर्य वाटण्याचे कारण नाहीं.

 चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचें वैभव वाढविणारी त्याची सेना मनुष्यबलाने 'प्रचंड, अत्यंत सुव्यवस्थित, जय्यत सामुग्रीनें समृद्ध असून प्राचीन काळी. उपलब्ध असलेल्या सर्व साधनसंपत्तीनें युक्त होती हैं सैन्य खडें होतें व त्याला - सरकारांतून वक्तशीर व भरपूर पगार, घोडे, शस्त्रास्त्रे व इतर सामुग्री मिळे. महापद्मनन्दाच्या सेनासागरांत ऐशीं हजार स्वार, बीस हजार पायदळ, आठ हजार रथ व सहा हजार लढवय्ये हत्ती असत.. याशिवाय चंद्रगुप्तानें पुष्कळ सेनासागर वाढवून सहा लक्ष पायदळ, तीन हजार घोडेस्वार, नऊ "हजार हत्ती; शिवाय रथ हैं सर्व कायमचे सैन्य ठेवून त्यांस वक्तशीर पगार देण्याचीहि व्यवस्था केली होती.

 प्रथमदर्शनीच आपला ह्या संख्याबलावर विश्वास बसणार नाहीं; परंतु हिंदी राजांनीं रणांगणावर ज्या सेना नेल्या तिकडे लक्ष दिलें म्हणजे आपली खात्री पटते. उदाहरणार्थ:--पोर्तुगीज अखबारनीस नुनेज हा सोळाव्या शतकांतील (१५०९-२० ) विजयनगरचा राजा कृष्णदेव याबद्दल असे खात्रीपूर्वक सांगतो कीं, या राजानें रायचूरवर चढाई केली त्या वेळी त्याजबरोबर ७०३००० पायदळ, ३२६०० स्वार ५५१ हत्ती व सिवाय बाजारबुणगे होते.

 फार प्राचीन काळापासून हिंदी सेनेचे, स्वार, पायदळ, हत्ती, रथ असे