पान:इतिहास-विहार.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
केळकरांचे लेख

विचार केला पाहिजे," कै० न्यायमूर्ति रानडे यांनी आपल्या 'मराठी सत्तेचा 'उदय' या पुस्तकांत म्हटल्याप्रमाणे " शिवाजीचा इतिहास, आपणांपुढें त्याची एकच बाजू म्हणजे त्याची वीरकृत्यें उभी करतो, परंतु तो जितका उत्कृष्ट सेनानी होता तितकाच राज्यकार्यधुरंधरहि होता, हे आपणांस विस- रता यावयाचें नाहीं. पहिल्या नेपोलियनप्रमाणे शिवाजी हा आपल्या काळांत उत्कृष्ट शासनकर्ता व शासनसंस्थांचा संस्थापक होता व त्यामुळेंच सतत बीस वर्षे मोगल सत्तेशी झुंजून नाना संकटांशी टकरा देत, राष्ट्रीय स्वातंत्र्या- चा मार्ग सुगम करून तो आपल्या अंगीकृत कार्यात यशस्वी झाला." शिवाजींत प्राचीन हिंदु राज्यांतील शासनपद्धति व तत्कालीन परिस्थितीस अनुरूप अंशी शासनपद्धति यांचे मधुर मिश्रण करण्याची अद्भुत शक्ति होती. तो कीर्तिशाली पूर्वजांचा वंशज होताच, व त्यानें आपणंहि आपल्या चंशेजांना बरीचशी कीर्ति राखून ठेविली होती.

 हिंदूंच्या पैकीं ब्रिटिशांच्या ताब्यांत गेलेले अगदी शेवटचे शीख होत. सतत दोन शतके त्यांनीं मुसलमानांबरोबर मोठ्या शौर्याने युद्धे केली. त्यांच्यातला शेवटचा वैभवशाली राजा 'पंजाबचा सिंह' म्हणून प्रसिद्ध असले- ला रणजितसिंग हा होय ! हा आपल्या वयाच्या २० व्या वर्षीच लाहोरचा सुभेदार झाला व त्याने युरोपियन लष्करी शिक्षकांच्या देखरेखीखाली इतकी 'फौज तयार केली की, शौर्य व धर्मतेज यांमुळे त्याच्या सेनेची क्रॉमवेलच्यां "आयर्नसाइड्सू बरोबर तुलना करता येईल.

 हिंदूंच्या प्राचीन राजकीय सुधारणांबद्दल दुसरा एक विचार करण्या- सारखा मुद्दा म्हटला म्हणजे त्यांच्या राज्यविस्ताराबद्दल होय ! वर ज्या प्रमुख प्रमुख राजांचा संक्षिप्त उल्लेख केलेला आहे त्यांच्या राज्यविस्ताराबद्दलहि 'थोडासा उल्लेख आला आहे. तथापि आणखीहि कांहीं उदाहरणे देतां येतील मि० व्हिन्सेंट स्मिथं अशोकाबद्दल म्हणतो:-

 "एकंदरीत त्यांच्या साम्राज्यांत, आजचे अफगाणिस्थान, हिंदुकुशाच्या दक्षिणेकडील मुलुख, बलुचिस्थान, सिंध, काश्मीर व नेपाळ ह्रीं खोरीं आणि हिमालयाच्या उतरणीवरचा मुलुख यांचा समावेश होत असून अगदी दक्षिण- ठोंकाशिवाय सर्व प्रदेश त्यांच्या साम्राज्यांत मोडत होता.

 श्री समुद्रगुप्ताच्या राज्यविस्ताराबद्दल सदर लेखक म्हणतो