पान:इतिहास-विहार.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१५९

पायाच्या पूर्व तयारीचें खरें काम त्यांने आगाऊच करून ठेवलें होतें. शिवाजीनें जरी 'महाराज छत्रपति' हें पद धारण केलें तरी शहाजीची 'राजा' ही पदवीहि अगदीच पोकळ नव्हती. शिवाजीचें नांव जरी पाश्चात्यांना परिचित असले तरी त्याच्या खऱ्या चरित्राबद्दल मात्र त्यां पूर्ण ज्ञान नाहीं. कलुषित इतिहासकारांनी द्वेषानें डोंगरांतला लुटारू, एवढे त्याचे वर्णन केलेले मात्र त्यांस माहीत आहे. म्हणूनच आम्ही मराठ्यांचा इतिहासलेखक ब्रॅन्डफ याचा उतारा उद्धृत करितों. तो म्हणतो:-" शिवाजी हा खरोखरच असाधारण पुरुष होऊन गेला. न्यायबुद्धीला त्याच कांहीं कृत्ये निंद्य वाटली तरी तो उच्च कोटींतला पुरुष होता है मान्य केलेच पाहिजे. अर्धनग्न मावळ्यांच्या झुंडीच्या झुंडी झुंडी गोळा करून त्यांच्या अंतः- करणात प्रचंड उत्साह उत्पन्न करून, त्यांना तो शीतोष्णादि ऋतूंचीहि पर्वा न करतां आपल्यामागें नेत असे. या गोष्टीचा विचार केला म्हणजे त्याच्या परा- क्रमाची कल्पना होईल. त्याचे नीतिसिद्धान्तहि अपूर्व असत. त्या वेळेच्या परिस्थितीचा विचार केला असतां, बलसंपादनार्थ त्यानें अंगिकारलेलाच मार्ग योग्य होता ही गोष्ट नाकबूल करता येणार नाहीं. त्यानें केलेली राज्यकारभाराची अंतर्गत व्यवस्थाहि लक्षांत घेतली पाहिजे. त्याला सारख्या लढाया माराव्या लागत, तरीहि त्याने प्रत्येक विभागाची उत्तम सुधारणा केली होती. नाना युक्त्याप्रयुक्त्या करून संकटांतून तो निभावून जाई. एकादा किल्ला सर करण्यांचा अगर एकादा दूरचा देश जिंकावयाचा तो बेत करीत असो, एकादी चढाई करो अगर पिछेहाट करो, शेंदोनशें स्वारांची शिस्त राखण्याची व्यवस्था करीत असो, अगर एकाद्या देशाच्या राज्यशासनाचे निर्बंध ठरवीत असो; प्रत्येक गोष्टींत त्याच्या चातुर्याबद्दल. आदर व त्याच्या युक्तिबुद्धीचें आश्चर्यच वाटतें. मितव्ययता हा एक त्याचा प्रधान गुण होता. व अलोट लूट सांपडली तरीहि घालून दिलेल्या नियमां- चें त्यानें उल्लंघन केलेलें नाहीं. त्याची धूर्तता, त्याची नम्रता, त्याची निधडी छाती, निश्चय, महत्त्वाकांक्षा व स्वतः च्या स्वार्थाविषर्थी बेफिकीर राहून, उत्साह जागृत करण्याची त्याची शक्ति, एकच ध्येय साध्य करण्या- ची त्याची मुत्सद्दीपणाची शिस्त व हातोटी, आणि तुच्छ लेखिलेल्या हिंदूंना राज्यपदावर नेऊन बसविणाऱ्या त्याच्या शहाणपणाच्या कारस्थानांचाहि
के... ११