पान:इतिहास-विहार.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
केळकरांचे लेख.

'माझी मायभूमि तुर्कीच्या हातीं जाणार नाही असे आश्वासन मला. मिळाल्याशिवाय मला समाधान वाटणार नाहीं ! "

 अर्वाचीन मराठ्यांत सर्वात जुने देवगिरीचे यादव हे होत. यांन १३ व्या शतकापर्यंत राज्य केलें. जगत्प्रसिद्ध वेरुळच्या लेण्यांमुळे तर त्यांची कीर्ति अमर झाली आहे. यानंतरच्या विजयानगरच्या राजांची : हकीगत पोर्तुगीज लेखकांनीं, अत्यंत उत्कृष्ट रीतीनें लिहिलेली आहे. हंपी- येथील आज मोडकळीस आलेले विजयस्तंभ पाहिले म्हणजे त्यांच्या वैभवाची पूर्ण कल्पना होते. नर्मदा व कावेरी यांच्या दुआबांत राज्य करणारे मराठे, व उत्तरेकडील रजपूत यांचे संबंध कसे होते यावद्दल जरी वाद असला तरी त्यांच्या कर्तबगारीबद्दल मात्र कोणासहि आक्षेप घेतां येणार नाहीं. मुसलमानी सत्तेशीं टक्कर देऊन, मराठी राज्याची संस्थापना करणारे शिवाजीमहाराज हे त्या सर्वात अत्यंत वैभवशाली होते ! त्यांचे. वंशज अद्यापिहि ब्रिटिश सरकारचे आधारस्तंभ मानले जातात. मि०एल्. फिन्स्टन यांनी आपल्या 'हिंदुस्थानचा इतिहास' या ग्रंथांत म्हटले आहे. कीं, 'कोणत्याहि हिंदुराज्यापेक्षां मराठ्यांचा राज्यविस्तार मोठा असून त्यांनी जवळजवळ सर्व हिंदु साम्राज्याचा उपभोग घेऊन आपला लौकिक कायम ठेवला. " हिंदुस्थानचा इतिहासकार सर वुइलियम हंटर हाहि मराठ्यांबद्दल लिहितो, "ब्रिटिशांनी हिंदुस्थान मोगलाकडून जिंकून घेतलें : नाहीं, हिंदूंपासून घेतलें. आम्ही जेते म्हणून उदयास येण्यापूर्वीच मोगल साम्राज्याची वाताहत झालेली होती. आमची शेवटचीं युद्धे, दिल्लीच्या बादशहाशी किंवा त्यांच्या बंडखोर सुभेदारांशी झालीं नसून मराठे व शीख या दोन हिंदु राज्यांबरोबर झालीं. मराठ्यांबरोबर शेवटचीं युद्धे. सन १८१८ मध्ये झाली."

 शिवाजीचा बाप शहाजी हा भाग्यदेवीचा लाडका शिपाई असेल, परंतु त्याने मोठ्या मुत्सद्दीपणानें विजापूर व अहमदनगर येथील राज्यांच्या द्वारें, दक्षिणेस पसरणाऱ्या मोगलसत्तेस प्रतिबंध केला. तो खराखुरा राजे निर्माण करणारा होता. व अहमदनगरच्या गादीवर एक नामधारी बाहु बसवून खरी राज्यसूत्रे तोच इलवीत असे व मराठी साम्राज्याची इमारत उभारण्याचें काम जरी त्याने आपल्या मुलावर सोपविले असले तरी त्या