पान:इतिहास-विहार.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१५७

सुलना केली तर, श्रेष्ठपणा बहुतेक रजपुतांच्याच बांट्यास जाईल. अत्यंत प्राचीन काळापासून पाहिले तरी, त्यांच्या पूर्वजांमध्ये दास्याचा अंशह आढळून येणार नाही. सामर्थ्यन्हास, मर्यादित राज्यविस्तार, तेजोभंग व कित्येक वेळां त्यांच्या पवित्र वंशांना जबरीनें लावलेले डाग, अशा गोष्टी असल्या तरीहि आपण तेजस्वी राजवंशांत उत्पन्न झालो आहोत ही जाणीव अंगांत मुरली असल्यामुळे त्यांनी आपले उदात्त वर्तन व घराण्याचा अभिमान यांचा लेश सुद्धां टाकिला नाहीं. ह्या तत्त्वानुसार, राजांच्या घराण्यां कितीहि क्रान्त्या झाल्या, तरी त्यांनी मर्यादेचें उल्लंघन केले नाही. आणि म्हणूनच सीझरप्रमाणें प्रत्यक्ष जहांगीर बादशहासुद्धां सिसोदिया घराण्याच्या इतिहासाचा टीकालेखक झाला. जहांगिराच्या दरबारी इलिझाबेथनें पाठवि- लेला वकील सर टॉमस रो, यानोंहि ह्या घराण्याच्या वैभवाबद्दल दिलेला आहे. तें वैभव सर्व रजपुतांच्या घराण्यांत सारखें दिसून येतें. युरोपांत ख्रिस्त-भूमि तान्यांत घेण्याकरितां झालेल्या युद्धापर्यंत चिलखतें बगैरे माहीतहि नव्हतीं; तीं युरोपियनांनी अरब लोकांपासून उचलली; परंतु त्यापूर्वीपासूनच रजपूत वीर चिलखतें, शिरस्त्राणे वगैरे परिधान करीत असत. युरोपांत ट्रायचें युद्ध झालेले नव्हतें, त्या वेळीं इकडे रजपूत लोक मोठ्या अभिमानानें शौर्याचे चिन्ह म्हणून हीं वीरभूषणें वापरीत असत. अंतःकलहानें रजपूत जरी निर्बल झाले होते, तरी ते मुसलमान अगर मराठे यांजपुढें सर्वस्वी नत असे कधींच झाले नाहींत. त्यांचे शौर्य, त्यांचा रुथाव, त्यांची उदारता, त्यांचा विनय, त्यांचें आदरातिथ्य यांबद्दल पर- स्थांनी स्तुतिस्तोत्रे गायली आहेत. हे रजपुतांमधील सद्गुण इतक्या कान्त्या झाल्या तरी मुसलमानी धर्मवेड व सत्ता यांच्या तडाक्यांतूनहि आजतागाईत जिवंत आहेत. आपल्या वीरकृत्यांनीं व उदार चरितांनी आपली कीर्ति अमर करून ठेवलेले रजपूत राजपुरुष अनंत आहेत. इतिहासकार कर्नल टॉडनें महाराणा प्रतापाबद्दल म्हटले आहे, 'अरवली पर्वतांत असा एकही घाट नाहीं की जो प्रतापाच्या कृत्यानें पावन झालेला नाहीं. हल्दीघाट ही मेवाडची थर्मापिली व देवीअरची रणभूमि ही मेवाडचें माराथान आहे: जेव्हां राणा प्रताप मृत्युशय्येवर पडला तेव्हां, महाराजांचा जीव कां घोटाळतो, त्यांस कशाच्या यातना होतात, म्हणून विचारले असतां तो म्हणाला,