पान:इतिहास-विहार.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
केळकरांचे लेख

सुरू केला. मि. व्हिन्सेंट स्मिथ यानें दक्षिणेतील, पांड्य, चेर, केरळ बं -सत्यंपुत्र या राजघराण्यांची माहिती दिली आहे. त्याबद्दल सविस्तर हकी- -कत देण्याची जरूर नाहीं. पण जातां जातां एवढे सांगितलें पाहिजे की, पांड्यराजांपैकी एकाने ऑगस्टस सीझरकडे आपले वकील पाठविले होते. -चोल घराण्यांतील राजा परंतक यांनी आपली सेना लंकेंतहि नेली होती. त्याच घराण्यांतील राजराज यानें लंकाविजयाचें कार्य पूर्ण केलें एवढेच नाहीं, तर आपल्या साम्राज्यांत सर्व मद्रास इलाखा, म्हैसूरचा बराचसा भाग व लखदीव मालदीवसारखी बेठें सामील केली. त्याने बांधलेल्या तंजावरच्या मव्य देवालयाच्या भिंतीवर, त्याच्या पराक्रमासंबंधीं लेख व 'चित्रे कोरलेलीं अद्यापहि दृष्टीस पडतात. राजेंदुचोलदेव यानें ओरिसा व बंगालप्रांत आपल्या छत्राखालीं आणले होते व त्यानें हिंदी - चिनी द्वीपकल्पा- वरं एक आरमारी स्वारी केली होती. याच ओळींत डॉ० भांडारकर यांनीं लिहिलेल्या दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासांत नमूद केलेलीं राज्यें, अगर मि० सेवेल यांचें 'विस्मृत साम्राज्य' - विजयानगरचे साम्राज्य-हीं येतात. मि० सेबेलने म्हटलें आहे कीं, विजयानगरचे साम्राज्य 'आस्ट्रिया'पेक्षां मोठें असून, सोळाव्या व सतराव्या शतकांतील युरोपियन प्रवाशांनी - त्यांची राजधानी विजयानगर ही, संपत्ति व भव्यपणा यांमध्यें, माहीत असलेल्या कोणत्याहि पाश्चिमात्य राजधानीशीं अतुलनीय आहे ! असे प्रत्यक्ष पाहून उद्गार काढलेले आहेत.

 याहूनहि अर्वाचीन काळाकडे येतांच आपणांस महाराजे, शूर योद्धे व राजनीतिज्ञ यांना प्रसवणाऱ्या तीन प्रमुख जातींचा उल्लेख केला पाहिजे. त्या तीन जाती म्हणजे रजपूत, मराठे व शीख ह्या होत !

 रजपूत हे राजकुलोत्पन्न असून त्यांचे शौर्य, धैर्य, एकनिष्ठपणा यांमुळे ते हिंदी भाटांच्या स्फूर्तिदायक गीतांना चिरकालिक विषय होऊन बसले आहेत. ते मोठ्या अभिमानानें आपल्या उत्पत्तीची परंपरा प्रत्यक्ष परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवितात. कर्नल टॉड आपल्या राजस्थानांत ' म्हणतो, 'राजस्थानांत छोटीं राज्यें ज्यांनीं केलीं व अद्यापहि कित्येक करीत आहेत, त्यांच्या प्राचीन सुप्रसिद्ध घराण्यांची जर युरोपांतील प्रसिद्ध वंशशि