पान:इतिहास-विहार.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१५५

प्रामुख्यानें नमूद केली पाहिजेत. दरायसचे समकालीन बिंम्बसार कः अजातशत्रु, पाटलीपुत्राचा संस्थापक उदय, अलोट संपत्तिवान् महापद्मानंद, राजकारणपटु ब्राह्मण चाणक्य याचा शिष्य प्रसिद्ध क्रान्तिकारक चंद्रगुप्तः मौर्य, ग्रीक सत्र ॲन्टिओकस याचा मित्र बिन्दुसार, भारतीय जगाचा विजेता व भगवान् बुद्धांनीं उपदेशिलेल्या उदात्त नीतितत्वांचा प्रचारकः अशोक, प्राकृत वाङ्मयाचा पुरस्कर्ता हल, आपल्या स्वतःच्या आरमारा- बद्दल व रौप्य नाण्यांबद्दल प्रसिद्ध असलेला यशश्री, नवशक- स्थापक. महिला चंद्रगुप्त, उत्तरेस गंगानदीपासून दक्षिणेस कांजीवरम् मलबारपर्यंत - मुलूख जिंकून भारतीय नेपोलियन हें पद प्राप्त करून घेणारा समुद्रगुप्त; पश्चिमेस सिंधुनदावर, पूर्वेस वंगप्रांतावर स्वाऱ्या करून, काठेवाड जिंकून अरबी समुद्रापर्यंत चाल करून जाणारा व ज्याचा दरबार विद्वानांबद्दल सुप्रसिद्ध असे असा दुसरा चंद्रगुप्त, श्वेतहूणावर जय मिळवून रानटी लोकांच्या जुलुमांतून देश मुक्त करणारा स्कन्दगुप्त, चलनी नाण्यांच्या सुधारणेबद्दल प्रसिद्ध असलेला प्रतापादित्य, हत्तीघोड्यांना सुद्धां गाळलेले पाणी पिण्याला मिळावें इतका आरोग्यशास्त्राच्या सुधारणेंत पुढे गेलेला शिलादित्य, हूण लोकांवर स्वाऱ्या करणारा प्रभाकरवर्धन, आणि सर्व. भारतवर्ष एक छत्राखाली आणण्याची महत्त्वाकांक्षा धरणारा हर्ष. हा हर्ष राजा रणभूमीवर साठ हजार हत्ती व एक लक्ष अश्वदल आणीत असे. हा आपल्या विद्वत्तेबद्दल व भक्तीबद्दल प्रसिद्ध असून, ह्यूएनत्संग यानें त्याची अंतःकरणपूर्वक स्तुति केली आहे.

 अर्वाचीन काळांतील खालील हिंदु राजांचाहि उल्लेख केला पाहिजे. दिल्लीचा जेता अनंगपाल; प्रतिभासंपन्न चारणांना अनंत-स्फूर्तिदायक विषय पुरविणारा खंदा रणगाजी पृथ्वीराज; टिरहटच्या दूर प्रांतानेंसुद्धां ' ज्याची साम्राज्यसत्ता मान्य केली असा कालेचुरी; शांततेतील सुधारणा युद्धकला ह्या दोहोंचाहि सारख्याच रीतीनें परामर्ष घेणारा, व नमुनेदार: हिंदु राजा म्हणून नाणावलेला माळव्याचा महाराजा भोज. उत्तर व पूर्व : हिंदुस्थानांतहि, सेन व पाल घराणी अशीच प्रसिद्ध आहेत. दक्षिणेतील. राजांमध्यें कर्नाटकचा पुलकेशी हा नांव घेण्यासारखा असून त्याजकडे. राणाहून वकील आले होते. कल्याणीचा विक्रमादित्य, यानें नवा- शक