पान:इतिहास-विहार.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
केळकरांचे लेख

हिंदुस्थानचा अंघ स्तुतिपाठक बनला होता; शिवाय साहित्य व तत्त्वज्ञान या 'दोहोंनींच राष्ट्राच्या संस्कृतीला पूर्णता येत नसते ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे म्हणून हिंदुस्थानांत कायम वस्ति केलेल्या आर्य व अनार्य जाति 'यांनी समाविष्ट असलेल्या हिंदी लोकांची संस्कृति दर्शविणारी परिस्थिति के त्यांचा पराक्रम यांचा आम्ही थोडक्यांत सारांश देण्याचे योजिले आहे.

 प्रथमतः आपण हिंदु लोकांकडे वळू. हिंदु लोकांच्या संस्कृतीची प्राचीनता इतकी दूरवर पोहोचते की, तिला जवळजवळ अनादि अथवा केवळ स्मृतिगम्यच म्हणतां येईल. तथापि, आपण वेदकालीन अथवा पुराणकालीन संस्कृतीची चर्चा करण्याचे सोडून केवळ ऐतिहासिक कालां- तील माहितीवरून पहाण्याचे योजिलें तरीहि आपणांस फार जुन्या काळा- कडे नजर फेंकली पाहिजे, मेकॉलेनें त्या काळाविषयीं विनोदानें अर्से म्हटले आहे की, 'त्या काळीं इंग्लंडचे लोक आपलीं रंगविलेलीं शरीरें कातड्यांनी पांघरून रानावनांत स्वैर भटकत असत', हिंदुस्थानासंबंधीं उत्कृष्ट शास्त्रशुद्ध अशा असंख्य गोष्टी स्पष्ट कालनिर्णयाच्या अभावी सोडून दिल्या तरी ऐतिहासिक काली - मि० व्हिन्सेंट स्मिथ ह्यांनी हिंदुस्थानांतील ऐतिहासिक कालाचा आरंभ ख्रिस्तीशकापूर्वी ७व्या शतकापासून ठरविलेला आहे - राष्ट्र या दृष्टीनें हिंदुस्थानच्या राजकीय ऐक्याबद्दल पुरावा मिळाला. आहे. एवढेच नव्हे, तर लेखनकलेचा प्रसार व जलमार्गाने होणाऱ्या व्यापाराची भरभराट यांबद्दलहि पुरावा सांपडला आहे. अतिप्राचीन - ऐतिहासिक लेखांवरून असें दिसतें कीं, हिमालय व नर्मदा यांमधील हा . प्रदेश, स्वतंत्र संस्थानें, कांहीं राज्यें व कांहीं लोकसत्ताक पद्धतीचीं राज्यें -यांमध्ये विभागला गेला होता. ख्रिस्तीशकापूर्वी ६ व्या शतकांत कोसल हैं प्रमुख साम्राज्य असून जगांतील सर्वोत मोठा धर्मोपदेशक भगवान् गौतम . बुद्ध जन्माला येण्याचे भाग्य त्याच्या वांटास आलें होतें. आणखी हेंदि ध्यानांत ठेवण्यासारखं आहे कीं, असल बहुतेक राज्यें, त्यांचें स्वयंशासनत्व न भंगत एकाच हिंदुसाम्राज्याच्या छत्राखालीं आणली जात असत अथवा त्याचा एक भाग म्हणून गणली जात.

 प्राचीन काळांतील थोर राजांच्या नाममालिकेंत खालील राजांचीं नांवें