पान:इतिहास-विहार.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानाची प्राचीन संस्कृति

इ सन १९१६ च्या डिसेंबर महिन्यांत लखनौ येथे भरलेल्या हिंदी ■ राष्ट्रीय सभेमध्यें जो स्वराज्य विषयक ठराव पसार करण्यांत आला होता; त्यामध्यें असें म्हटलें आहे कीं—

 "हिंदुस्थानांतील मोठमोठ्या जातीचे लोक, हे प्राचीन काळींचं सुधार- "लेल्या लोकांचे वंशज असून त्यांनी आपल्यामध्ये राज्यकारभार चालवि- .ण्याची पात्रता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आणि ब्रिटिश अमलाखालीं एक शतकांत शिक्षण आणि सार्वजनिक कळकळ या बाबती-- त त्यांची पुष्कळ प्रगति झाली आहे. म्हणून हिंदुस्थानास स्वराज्याची प्राप्ति करून देणें, हा इंग्रजी राजनीतीचा उद्देश व हेतु आहे असा जाहिरनामा: बादशहांनीं लवकर काढण्याची मेहेरबानी करावी. "

 हिंदुस्थानचा पूर्ण द्वेष करणाऱ्या टीकाकारांनाहि नाकबूल करितां येण्यासारखी कोणती एखादी गोष्ट असेल तर ती ही की, हिंदु- स्थानांत प्राचीन काळीं अत्युत्तम अशी संस्कृति होती. सन १८८२ मध्ये हिंदी सिव्हिल सर्व्हिसच्या उमेदवारांपुढें भाषण करतांना प्रो० मॅक्स मुल्लर यांनी हिंदुस्थानाविषयीं खालील खुतीपर उद्गार काढले. ते म्हणाले " सर्व जगांत निसर्गदत्त संपत्ति, सामर्थ्य आणि सौंदर्य यांनी समृद्ध कांही ठिकाणी तर केवळ नंदनवनच असा देश जर मला दाखवावयास सांगितला तर मी हिंदुस्थानाकडेच बोट दाखवीन. मला जर कोण असे विचारले की, भूतलावरील कोणत्या भागांत मानवी बुद्धिमत्तेच्या अत्युत्तमं देणग्या विकास पावल्या आहेत व तिनें जीवितगूढांतील प्रश्नांचा उत्कृष्ट-- पणाने छडा लावला आहे व प्लेटों आणि कॅन्ट यांचा अभ्यास करणारा:- हि लक्ष आकर्षण केलें जाईल अशा रीतीनें त्या प्रश्नांपैकी काहींचा समाधानकारक निकाल तिनें कोठें लावला आहे ? असें जर मला कोण विचारले तरीहि मी हिंदुस्थानाकडे बोट दाखवीन."

 कदाचित् असा आक्षेप घेण्यांत येईल कीं, प्रो० मॅक्समुलर हा, हिंदी साहित्य व तत्वज्ञान यांच्या लालित्यानें व सौंदर्यांने मुग्ध होऊन