पान:इतिहास-विहार.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
केळकरांचे लेख

दिल्लीच्या बादशहाला आपला राजा करावा असें वंडवाल्यांनी ठरविलें व ते दिल्लीच्या मार्गानें निघाले, ब्रह्मावर्त टाकून ते एक मुक्काम पुढेहि गेले; पण लोक उतावळे झाले होते. दिल्ली तर दूर होती. तेव्हां ते जवळपास राजा शोधू लागले तेव्हां पेशव्यांचा वंशज असल्याचे त्यांना कळलें व ते बंड- वाले एक मुक्काम पुढे गेलेले परत ब्रह्मावर्ताला आले. त्या म्हाताऱ्या गृहस्थानें मला जी हकीकत सांगितली ती अशी :- संध्याकाळी ५ वाजतां ते बंडवाले ब्रह्मावर्तास आले. त्या वेळीं नदीच्या कांठीं रावसाहेब, नानासाहेब वगैरे मंडळी बसली होती. ते बंडवाले नानासाहेबांना म्हणाले की, 'आपण आमचे राजे व्हा', त्या वेळीं नानासाहेबांनी मी होणार नाहीं' असे उत्तर दिलें, तेव्हां बंडवाल्यांनी सांगितलें कीं, या बंडांत सामील तरी व्हा, नाहीं तर आपल्याला इथल्या इथें तोडूं. रावसाहेबांनीहि नानासाहेबांना भर दिली. बंडवाल्यांचा एकच सवाल कीं, आमचे पुढारी व्हा नाहीं तर मेरा !. अशा स्थितींत नानासाहेबांना त्यांत सामील व्हावें लागलें, याच्यापूर्वीच कानपूरला पहिली कत्तल झाली होती. त्यानंतर दुसरी झाली. आपली बायकामुले नार्वेत बसवून न्या असें साहेबांना नानांनी सांगितलें, त्याप्रमाणे गंगेतून नावा चालल्या. बंडवाले यांची कत्तल करा म्हणत होते; पण नानासाहेबांनी खूप विरोध केला. शेवटीं बंडवाल्यांनी त्यांचे ऐकले नाहीं. त्यांनी तोफ डागून नाव बुडविली व शेवटी या सर्वाचें खापर नानांच्या माथीं फुटले. पुढे तेथून नानासाहेब पळाले ते ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत राहिले व अखेर ते नेपाळमध्ये गेले. पुढे त्यांचे काय झालें हें सांगतां येत नाहीं. या सर्वावरून आपल्या हें ध्यानांत येईल कीं, त्या वेळीं जे बंड झाले तें. अन्यायाविरुद्ध झाले व त्यांना नाइलाजाने बंडांत सामील व्हायें लागलें लक्ष्मीबाई वंडांत सामील झाल्या तरी त्यांत राज्यक्रान्ति नव्हती. त्यांचे जे अलौकिक गुण आहेत, त्यांची मोकळ्या मनानें आठवण करण्यास कांहीहिं हरकत नाहीं. यांत सरकारचा गुन्हा नाहीं. कोणतेंहि पाप नाही. आपल्यांतील चांगली स्त्री भारतीय योद्धयाप्रमाणे लढली, किल्ला जातीनें लढविला, अशा तेजस्वी स्त्रीचें गुणवर्णन करणें जरूर आहे. ही एवढी हकीगत सांगण्याचें कारण कांहीं सुज्ञ माणसांना अजूनहि या बाबतीत शंका येते म्हणून हा वृत्तांत सांगितला. "