पान:इतिहास-विहार.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
केळकरांचे लेख

लागावे व नौका- रचनेच्या या जुन्या विद्येस फिरून चालन द्यावें असें सरकारच्या मनांत येणें शक्यच दिसत नाहीं. अशा स्थितीत प्रो० मुकरजी यांच्या पुस्तकाने झाले तरी कोणती कामगिरी साधणार, असें कोणासहि वाटण्याचा संभव आहे. ठीकच आहे. कारण या बाबतीत इतिहास - संशोधनाच्या हजारों पुराव्यांचे कागद एकत्र शिवले तरी मासे मारणान्या कोळ्याची एखादी यःकश्चित् होडीहि त्यापासून तयार होणार नाहीं ! तरी पण नाविक विद्येबरोबर त्या विद्येची आमची कोरडी आठवणहि जी बठत चालली होती ती प्रो० मुकरजी यांनीं ताजी टवटवीत केली. हा झाला तरी त्यांचा उपकार कांहीं लहान आहे असें म्हणतां येत नाहीं.

झांशीच्या महाराणी
श्री. लक्ष्मीबाई साहेबांची पुण्यतिथि

झाशीच्या महाराणी श्री० लक्ष्मीबाईसाहेब यांच्या स्मरणाचा दिवस पाळण्याचा हा उपक्रम नवाच ;तथापी असले उत्सव झालेले बरे. वर्षाच्या पंचांगांत सगळे अशा प्रकारचे दिवस नोंदले जावे. यांतील कांहीं दिवस कोणी धार्मिक दृष्टीने पाळतील, कांहीं दिवस राष्ट्रीय दृष्टीनें पाळतील. रोजनिशींत प्रत्येक पानावर संस्मरणीय वाक्यें दिलेली असतात, त्यांचा उपयोग काय ? तर वाक्य वाचले तर तितकाच वेळ त्याच्या चिंतनांत जातो. राणीसाहेबांची पुण्यतिथि पाळण्याचे बाबतींत कांहीं सुश माणसांच्या मनामध्येहि गैरसमजच आहे. इतिहासाचे प्रेमी व अनुभवी असे एक गृहस्थ आज मला म्हणाले की, लक्ष्मीबाईची पुण्यतिथि पाळणें चरोबर नाहीं. मी या सभेला हजर रहात नाहीं. लक्ष्मीबाईसाहेबांनी एवढें घोडें काय मारलें ? मेलेल्या स्त्रीच्या उज्ज्वल चारित्र्याची आठवण करणें यांत गैर काय आहे ? ही सरळ गोष्ट आहे. त्या चंडांत सामील झाल्या एवढाच त्यांच्या बाबतीत दोष दाखविण्यांत येतो. त्या बंडांत सामील झाल्यावर त्यांचा ज्या रीतीनें शेवट व्हावयाचा तो झाला. आज आपण जो उत्साव करीत आहों, तो त्या बंडांत सामील झाल्या याकरितां नसून,