पान:इतिहास-विहार.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यनौकानयन

बांधली जात. १७०२ साली इंग्रजांना लढाऊ जहाजे वैवियाची त्यांकरितां युरोपांतून कामगार आणावे असें चालले होतें; पण तसे करण्याचें कारण भाग पडलें नाहीं. उलट लावजीशेठनें बांधलेल्या जहाजांची कीर्ति युरोपांत पसरली. यापूर्वीच १७७५ साली, मुंबईची गोदी पाहून इतकी मोठी व सोईस्कर गोदी सर्व युरोपांत नाहीं असे एकानें लिहिल्याचा दाखला सांपडतो. मुंबईत जहाजे बांधण्याला विलायतेपेक्षां पाऊणपट खर्च कमी येतो व शिवाय मुंबईत बांधलेली जहाजें विलायतेंत बांधलेल्या जहाजांपेक्षां तिप्पट टिकतात, असे सरकारी उल्लेख सांपडतात ! कलकत्याच्या हुबळी नदीवरील गोदाँत १८७६ पर्यंत बरीच मोठीं जहाजे बांधली जात. पण सन १८६० पासून या धंग्रास विलायतेस तेजी येऊन इकडे मंदी आली. सन १८११ सालीं एका फ्रेंच गृहस्थानें हिंदी कारागिरीसंबंधानें खालील उद्गार लिहून ठेवले आहेत:- -" In ancient times the Indians. excelled in the art of contracting vessels and the present. Hindus can in this respect still offer models to Europe, 80 much s3 that the English, attentive to everything which ralates to naval arohitecture, have borrowed from the Hindus many improvements which they have adopted with success to their own shipping. The Indian vessels unite elegance and utility and are models of patience, and five workmanship–“ इंग्रज लोकांनी हिंदु कारागिरीपासून जहाजे बांधण्या वित अनेक नमुने उचललेले आहेत. हिंदी जहाजांत सौंदर्य क उपयुक्तता हीं दोनहि साधलेली असतात. "

 अशा रीतीने गेल्या शतकापर्यंत सुस्थितीत असलेल्या या हिंदी कारा गिरीचा फिरून उदय होईल का ? असा प्रश्न यानंतर आपोआपच सुचतो. पण तूर्त तें चिन्ह दिसतं नाहीं, असेंच उत्तर द्यावें लागेल. आपली जहाजें आपल्याच देशांत बांधली जावीं अशी सर्वानाच इच्छा असणार; व कनडी बसाहतीकडून इंग्लंडला मदतीदाखल मिळणाऱ्या जहाजांसंबंधानें कॅनडांतील मुत्सद्दयांनीं 'आमर्ची जहाजें आम्ही बांधूं' अशी अट घातली होती. परंतु प्रधान मि० चर्चिल यांनी ही मागणी हास्यास्पद ठरविली! खुद्द कॅनडाची ही स्थिति असल्यामुळे हिंदुस्थानांत गोद्या बांधून इकडे जहाजे तयार करू