पान:इतिहास-विहार.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
केळकरांचे लेख

यांच्या दरम्यान सर्रास व्यापार चालत असे, दक्षिण हिंदुस्थानांतून कला- कुसरीचा माल विकत नेऊन त्याच्या मोबदला रोमच्या व्यापान्यांनी दिलेली सोन्याची नाणी तिकडील भूमींत अजून सांपडतात. मुसलमानांचे -राज्य हिंदुस्थानांत होईपर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनान्यावरील लोक लोन, जावा, सुमात्रा व चीन येथपर्यंत जाऊन वसाहती करीत. पश्चिम- कडे सौराष्ट्रांतील लोक इराणाकडील मुख्य शहरी वसाहती करून व आपला धर्म संभाळून रहात असत. असे चिनी प्रवासी ह्यू अॅनसंग यानें लिहिलें आहे. पूर्वेकडे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरितां हिंदी भिक्षु धर्मोपदेशक चीन व जपानपर्यंत गेले होते ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. बोधिसेन नांवाचा बौद्ध भिक्षु आठव्या शतकांत जपानांत जाऊन जपानी भिक्षूंना संस्कृत शिकवीत राहिला होता. याच सुमारास दोघां हिंदी गृहस्थांनी जपानांत कापसाची लागवड सुरू केली असा उल्लेख जपानी सरकारी दप्तरांत आढळतो. दहाव्या शतकांत झालेल्या चोलवंशीय राजांचा ताबा व दरारा समुद्रावरहि असे व एका चोल राजाच्या कारकीर्दीत तर लखदीव मालदीव वगैरे शेंकडों बेटे त्याच्या आरमाराने काबीज केली होतीं, यानंतर झालेल्या काळासंबंधानें विशेष सांगण्याचें प्रयोजन नाहीं. मोगलांच्या कारकीर्दीत व त्या- नंतर पुढेंहि कांहीं थोडे दिवस समुद्रावरील व्यापार सुरू असून खुद्द मराठ्यांचे: खास आरमार होते, व गेल्या दोनतीन शतकांत पोर्तुगीज, डच व इंग्लिश यांच्यांशी असलेले दर्यावदी हिंदी लोकांचे दळणवळण आणि परस्परांच्या आरमारावरील लढाया यांची वर्णनें इतिहासांत वाचावयास मिळतात. आयने अकबरींत मोगलांच्या आरमारखात्याचें उत्कृष्ट वर्णन सांपडते; क रा० ब० पारसनीस यांनी कांहीं वर्षापूर्वी लिहिलेला 'मराठ्यांचे आरमार' हा निबंध ज्यांनी वाचला असेल, त्यांना त्या ठिकाणीं त्या विषयाची बरीच माहिती एके ठिकाणी वाचावयास मिळाली असेल.

 इंग्रजांच्या कारकीर्दीत पहिल्या पहिल्याने इकडे जहाजें वांधण्याच्या धंद्यास पुष्कळच उत्तेजन मिळालें. सन १७३५ सालापर्यंत सुरतेस जहाजें बांधण्याची गोदी चालू होती; त्यानंतर ती मुंबईस सुरू झाली. मुंबईच्या जहाजे बांधण्याच्या कारखान्यावर लावजी नसरवानजी या नांवाचा पारशी होता व त्याच्या देखरेखीखाली इंग्रज सरकारचीं इकडील सर्व जहाज़े