पान:इतिहास-विहार.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यनौकानयन

१४७

वर्णन आहे. अशाच तिचि अप्रत्यक्ष उल्लेख जातक वगैरे बौद्ध ग्रंथांतून पुष्कळ सांपडतात.

 युरोपिअन ग्रंथकारांनीहि हिंदुस्थानच्या परदेशी व्यापारासंबंधानें ठिक- ठिकाणी लिहिले आहे. डॉ० साईस यांच्या मतें हिंदुस्थान व असीरिया देश यांच्या दरम्यान ख्रिस्ती शकापूर्वी तीन हजार वर्षे व्यापार सुरू होता. प्राचीन बॅबिलोनी शब्दसंग्रहांत 'सिंधु' हा शब्द एक प्रकारच्या मलमली. च्या कापडाला लाविलेला आढळतो. नेबुचडनेझार या प्रसिद्ध बॅबिलोनी राजाच्या राजवाड्यांत फक्त हिंदुस्थानांत सांपडणाऱ्या अशा कित्येक जातीं- च्या लांकडांची तुळवरें असल्यांचा एकानें शोध लाविला आहे !. ख्रिस्ता- पूर्वी पांचव्या शतकांत तांदूळ, मयूर, चंदन वगैरे पदार्थ त्या वेळच्या हिंदी नावांनीच ग्रीसमध्ये उल्लेखिले जात. प. वा. जॅक्सनसाहेब यांनी मुंबईच्या गॅझिटिअरमध्ये असें सिद्ध केलें आहे की, भडोच व सुपारावंदर यांच्या व बॅबिलोनियांच्या दरम्यान, ख्रिस्तापूर्वी आठ सात सहा या शतकांत सर्रास व्यापार चालत असे. इजिप्ट व हिंदुस्थान यांजमध्यें पूर्वी चाललेल्या व्यापारासंबंधी कोणासच शंका नाहीं. या व्यापाराचा अप्रत्यक्ष पुरावा बायबलाच्या जुन्या करारांत सांपडतो. बायबलांतील किंग सॉलोमन व किंग हिरॅम यांच्या काळी असणारे व्यापाराचे कित्येक मौल्यवाद जिन्नस दक्षिण हिंदुस्थानच्या जमिनीत पिकत होते असें रे. फूक्स यांचें म्हणणें आहे. हिरोडॉट्स वगैरे ग्रीक ग्रंथकारांच्या ग्रंथांतून असेच उल्लेख सांपडतात. अलेक्झांडर सिंधुनदांतून पार झाला तेव्हां त्याला हिंदुस्थानांत. बांधलेली हजार दोन हजार जहाजें मिळाली ही गोष्ट तर ऐतिहासिकच आहे !

 मौर्य राजांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानांत मोठमोठ्या गोद्यांमधून जहाजें बांधण्याचा मोठा धंदा चाले असा पुरावा सांपडतो. चंद्रगुप्ताच्या अठरा कारखान्यांपैकी हा एक सरकारी कारखानाच होता, व बंदरांतील अंकाती- च्या नियमांचा एक तर ग्रंथच होण्यासारखा आहे ! अशोकाच्या वेळीं सीरिया, इजिप्ट, ग्रीस व सीलोन येथपर्यंत समुद्रावरील दळणवळण होतें आणि सैन्याप्रमाणें अशोकाच्या पदरीं मोठें आरमारहि असावें, असें व्हिन्सेन्ट स्मिथ या इतिहासकाराचे म्हणणे आहे. ख्रिस्तापूर्वी दुसऱ्या- तिसऱ्या शतकांत आंध्र राजांच्या कारकीर्दीत दक्षिण हिंदुस्थान व रोम