पान:इतिहास-विहार.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
केळकरांचे लेख

आंध्रकालीन कित्येक नाणीं सांपडतात. त्यांजवर जहाजांचीं चित्र आहेत. आणि या कालासंबंधानें म्हणजे यज्ञश्री राजाच्या कारकीर्दीत, हिंदुस्थानचा व्यापार पश्चिमेकडे ग्रीस, रोम, इजिप्तपर्यंत व पूर्वेस चीनपर्यंत चालत होता असे सेवेलसाहेबांचें मत आहे. कारोमांडल किनाऱ्यावर कुरुंबर अथवा पल्लव राजांच्या काळचीं अशींच नाणी सांपडतात, व या राजांच्या काळ परदेशांशी समुद्रावरून आमचा व्यापार चालत होता, असेंच सर वॉल्टर ईट यांनी अनुमान काढले आहे.

 प्रत्यक्ष पुराव्याप्रमाणे अप्रत्यक्ष पुराव्याचाहि परिश्रमपूर्वक शोध व उपयोग प्रो० मुकरजी यांनी केला आहे. वरुणाला सर्व समुद्रपथांची माहिती होती. व्यापारी लोक सफरीचे धोके मनांत न आणतां समुद्राच्या सर्व भागांवर जात. दुर्गांचा मुलगा भुज्जू यानें शत्रूवर स्वारी केली असतां त्याचे जहाज फुटलें व शंभर बल्ह्यांनीं वदविलेल्या आपल्या नावेंत अश्विनांनी त्याला उचलून घेतलें असे उल्लेख ऋग्वेदांत आहेत. रामायणांत लोहितसागर, यवद्वीप, सुवर्णद्वीप यांचे उल्लेख आहेत, ते हिंदी लोक दूरच्या सफरी करणारे नसते तर आले नसते. सहदेवानें ताम्रद्वीपांतील लोक जिंकले, व सागरद्वीपवासीयांना वश केलें याचें मर्म उघड आहे. धर्म- सूत्रांत परदेशगमनाचा ब्राह्मणांपुरता निषेध सांगितलेला असो; तथापि ज्या वैश्यांना परदेशगमन खुलें होतें ते हिंदुस्थानांतीलच होत. समुद्रावरून आणलेल्या मालावर जकात किती घ्यावी, नाविक लोकांनीं नुकसानी कोणती व किती भरून द्यावी, अशाविषयीं स्मृतिग्रंथांतील व्यवहाराध्यायांत. नियम सांपडतात. बृहत्संहितेत समुद्रयानासंबंधीं ज्योतिषशास्त्रदृष्टया उल्लेख. आहेत. पुराणांतून व काव्यांतून सांपडणारे असले उल्लेख पुष्कळांच्या वाचण्यांत येण्यासारखे आहेतच. रत्नावलीतील सिलोनची राजकन्या समुद्रांत जहाज फुटून वहात चालली असतां दर्यावर्दी व्यापाऱ्यांनीं कौशांबी येथें आणिली असल्याचें सांगितलें आहे. दशकुमारचरितामध्यें रत्नोद्भव - आणि मित्रगुप्त यांच्या समुद्रावरील सफरींच्या गोष्टी आहेत. शिशुपाल-- वृधामध्यें, श्रीकृष्ण द्वारकेहून हस्तिनापुराला जात असतां वात अनेक देशाचे व्यापारी जहाजांतून माल भरून जात असलेले त्यानें पाहिलें असें