पान:इतिहास-विहार.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यनोंकानयन

१४५

ब कसें असावें ? त्यांना बाहेरून व आंतून शोभां कशी आणावी? जहाजांत बसून जाणान्या लोकांच्या सुखाकरितां सोयी कशा कराव्या. १. वगैरे सर्व • विषयांचे पद्धतशीर वर्णन आहे. जहाजांतील मंदिरें हिरेमोत्यांनी श्रृंगारण्या- पासून लढाईच्या प्रसंगी जहाजांची सिद्धता कशी ठेवावी येथपर्यंत या ग्रंथांत वर्णन सांपडते. अर्थात् हें काल्पनिक नसून अनुभवसिद्ध आहे असेच म्हटले पाहिजे. वेदामध्यें नौकानयनाचे उल्लेख आहेत. भारतांत पांडव बसून गेलेल्या नौकेचें वर्णन " सर्ववात सहाम् नावम् यंत्रयुक्ताम्- पताकिनी म् या शब्दांनीं सांपडतें. रामायणांत (अयोध्याकांड) लढाऊ नौकांचा उल्लेख आहे. भागीरथीच्या पात्रांत युद्ध करणाऱ्या नौकांचा उल्लेख रघुवंशांत आहे.. 'राजपलीये' नामक पाली ग्रंथांत बंगालच्या सिंहबाहू राजाचा मुलगा विजय ज्या जहाजांतून गेला त्यांचें वर्णन आहे. तसेंच सिंहल राजा जंबुद्वीपाहून सिलोनला गेला, त्या जहाजांचें वर्णन आहे. त्यावरून सातरों आठशें व्यापारी व मुशाफर नेण्यायेवढीं तीं जहाजें मोठी होती असें दिसतें. जातक ग्रंथामध्येंहि असेच पुरावे सांपडतात.

 सांची येथील बौद्ध स्तूपावरील चित्रांत जहाजांचीं स्वच्छ चित्र आहेत. कान्हेरी येथील लेण्यांत समुद्रप्रवासाचा देखावा कोरलेला असल्यामुळे इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकासंबंधानें हा पुरावा ग्राह्य होय. पुरी येथील जगन्नाथाच्या देवळांत आणि बिंदुसरोवर येथील भुवनेश्वराच्या. देवालयांत प्रो० मुकरजी यांना असाच शिल्पमय पुरावा मिळाला. अजिंठा येथील कोरीव लेण्यांत हाच पुरावा मिळतो. नंबर एकच्या गुहेंत एक चित्र आहे. त्यांत सातव्या शतकांत पुलकेशी राजाकडे आलेला इराणचा राजा खुसरू याचा वकील आपले अधिकारपत्र सादर करीत आहे असा देखावा असल्याचे मानतात. याचा अर्थ असा की, इराणपर्यंत आमचे दळणवळण व दराराहि होता. ग्रिफिथ्स यानें अजिंठा येथील लेण्यांतील इतर वित्येक चित्रांवरून त्यावेळीं व त्यापूर्वी परदेशांशी असलेल्या हिंदुस्थानच्या व्यापाराचे अनुमान काढलेले आहे. सातव्या-आठव्या शतकांत जावा, कॅबोडिया, सयाम, चीन व जपान येथपर्यंत हिंदी लोकांच्या सफरी होत होत्या. व कांहीं ठिकाणी वसाहती झाल्या होत्या. फिलॅडेल्फिया येथील ग्रंथसंग्रहा. यांत हिंदुपद्धतीच्या जहाजाचा एक नमुना पहावयास सांपडतो. तसेच