पान:इतिहास-विहार.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यनौकानयन

१४३

नाहीं; व दीडशे वर्षापूर्वीपर्यंत नौकानयनाची जी विद्या आम्हांला अवगत होती - दर्यावर्दीपणाचें जें धारिष्ट आमच्या लोकांमध्यें होतें तें या दरम्यान - च्या काळांत सफाई नाहींसें झालेलें असून इतिहाससंशोधनानें फक्त प्राचीन काळाची स्मृति जागृत करण्यापलीकडे दुसरें सुख हल्लीं राहिलेलें नाहीं.

 आज म्हणजे तुम्हांला परदेशी जाण्यास किंवा परदेशाहून कोणताहि जिन्नस आणविण्यास त्रास पडतो असे मुळींच नाहीं. परदेशीं मुशाफरी स जावयाचे तर नुसतें टॉमस कुक अँड सन्स यांना एक पोस्टकार्ड टाकिले असतां तुमच्या प्रवासाची सर्व सिद्धता तत्काल होते. तुमचें जड़जोखमीचें. सर्व सामान चिठ्या मारून जहाजांतील तुमच्या खोलींत बंदोबस्तानें ठेवलें जातें; आणि तुम्ही आजारी किंवा ऐदी असाल तर तुम्हांस खुर्चीवर घालून तुमच्या खुषीनेंच तुमची उचलबांगडी करून धक्क्यावरून आग- बोटींत व आगबोटीवरून धक्क्यावर अशा रीतीनें बिनबोभाट चढविण्यांत: ब उतरविण्यांत येतें कीं, पावलांची टांच भिजल्याशिवाय सातासमुद्रां- वरून पृथ्वीप्रदक्षिणा करून तुम्हांस आपले बिन्हाडीं परत आणून 'सोडण्यांत येईल. इतकें तुमचें दास्य करावयाला टॉमस कुक कंपनी अथव दुसरी एखादी कंपनी सहज मिळू शकते ! स्वत: तुम्हांस फार झालें तर शेर अच्छेर वजनाच्या लुसलुशीत कमाविलेल्या कातड्याच्या पाकिटांत जरूर तेवढे सोन्याचें नाणें किंवा हुंड्यांचें विंडोळें घेतलेले असलें म्हणजे झालें! व्यापारधंद्याचीहि अशीच गोष्ट आहे. तुमची पत असल्यास एक'. पोस्ट कार्ड टाका. अगर ती नसल्यास दर्शनी हुंडीची एक चकती जगाच्या वाटेल त्या भागांतील व्यापारी शहरास तुम्ही घाडा, की जो लागेल तो परदेशी माल ठाकठीक बांधूनसवरून तुमच्या घरी येऊन सुरक्षित पडतो. पण राष्ट्रीय दृष्टीनें पहातां या सुखापलीकडचेंहि एक कल्पनागम्य आहे व तें हें कीं, वर सांगितल्याप्रमाणे सफरीस जाऊन येणें- तें तुम्हीं तुमच्या स्वतःच्या म्हणजे अर्थात् स्वदेशी कंपन्यांच्या आगबोटी, तून जावें यावें आणि माल आणणे नेणें तो आपल्या हिंदी लोकांना चढत्या व उतरत्या बंदरांत आपल्या बोटींत आपल्या हाताने भरावा आणि. उतरात्रा, म्हणजे अर्थात् ही ने-आण करण्याचा बराचसा नफा तुमचा तुम्हांला मिळावा.
के... १०