पान:इतिहास-विहार.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उमाजी नाईकाचें चरित्र

१४१

कोणता अपराध केला होता ? व त्यांस छळण्याचा त्याला काय अधिकार होता?

 व्यक्तिशः उमाजी नाईकाच्या गुणावगुणांचा येथवर विचार झाला. तथापि त्याचाच पोवाडा आजवर लोकांनी कां म्हणावा ? इतर दरोडेखोर काय थोडे झाले ? त्यांचा पोवाडा कां झाला नाहीं ? या प्रश्नाचें उत्तर असें आहे की, आम्हीं प्रारंभीं सांगितल्याप्रमाणें ह्या दरोडेखोरांच्या शौर्याची व कर्तृत्वाची त्याच्या समकालीन लोकांच्या मनांवर फार विलक्षण छाप पडलेली असली पाहिजे. कालांतरानें या छापेचा परिणाम असा होतो कीं, दुष्टकृत्यें विसरलीं जातात; व मनुष्यमात्रांत साधारणतः शौर्यादि गुणांचा उत्कर्ष कमी असल्यानें, हे गुण ज्यांच्यामध्यें आहेत असल्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर मात्र शिल्लक राहून त्यांचे पोवाडे बनतात. असले पोवाडे सर्वत्र देशांत आढळून येतात. 'रॉबिनहुड' याचें नांव माहीत नाहीं असा एका इंग्रजी वाचक सांपडणार नाहीं. खरा रॉबिनहुड हा असाच कोणी तरी उभाजी रामोशासारखा दरोडेखोर असावा. तो विनोदी, शूर, थट्टेखोर, परोपकारी व प्रेमळ असा असून, गरीबांवर दया करणें, श्रीमंतांची फजिती करणें वगैरे उदारमनस्कतेच्या दर्शक अशा कित्येक गोष्टींमुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कीं, आज सातशे वर्षेपर्यंत त्याचे पोवाडे इंग्लंडांत चालत असून लहान मुलांच्या पुस्तकांतून देखील त्याजविषयींचे धडे आढळून येतात ! रॉबिनहुडचा ज्यामध्ये संचार असे ते 'शेरवुड' नांवाचें अरण्य, त्याची प्रियतमा मेड मेरियन, त्याचे विनोदी व जिवाचे दोस्त फायर टक व लिटल जॉन वगैरे सर्व मंडळी इंग्रजांत अत्यंत लोक- प्रख्यात कादंबरीकार सर वाल्टर स्कॉट यानें आपल्या प्रिय आहेत. 'आयव्हॅनो' नांवाच्या कादंबरीत व 'रोकबी' नांवाच्या कादंबरीमध्ये दरोडे- खोरांच्या अद्भुतरसपूर्ण चरित्राचें उत्कृष्ट चित्र काढलेले इंग्रजीच्या वाचकांस आठवत असेलच तसेच, इटाली व स्पेनमधील दरोडेखोर --दर्या- किनान्यावरील जकात चुकवून माल पळवून नेणारे व वांचेपणाचा धंदा करणारे-वगैरे लोकांसंबंधानहि त्यांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून, रसिक जनता त्यांच्या शूर कृत्यांचे पोवाडे गाण्यास कशी तयार असते, यांचा इंग्रजी मासिक पुस्तकें वाचणारांस नित्य अनुभव आहेच. फार लांब कशाला ?