पान:इतिहास-विहार.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
केळकरांचे लेख

परंतु आम्हीं प्रारंभीं सांगितल्याप्रमाणें उमाजीच्या अवगुणांबरोबरच - त्याच्या अंगी शौर्य, साहस इत्यादि गुणहि असे विलक्षण होते कीं, त्यामुळे त्याच्या शत्रूसहि त्याचें चरित्र लिहावेसें वाटलें. उमाजी हा निर्व्यसनी, परोपकारी व श्रद्धालु असा होता. त्यानें श्रीमंतांस त्रास दिला तरी गरीबांवर दया केली. त्याच्यासंबंधानें कॅ० मॅर्किटॉशसाहेबांनी असे लिहून ठेवलें आहे कीं, 'काळाच्या प्रतिकूलतेमुळें, तो मराठी राज्यांत एखादा शूर सरदार झाला असता पण लुटारूपणाचा धंदा पत्करल्यानें दरोडेखोर व बंडखोर झाला'. सरदार होण्यासारख्या गुणाच्या मनुष्यास दरोडेखोरी आठवावी, यासारखी शोचनीय दुसरी कोणतीच गोष्ट नाहीं ! परंतु या बाबतीत उमाजीचा काळ व त्याचा आनुवंशिक संस्कार हींच कारणीभूत होत, यांत शंका नाहीं, तसेंच बंडखोरी करूं लागण्यापूर्वी कांहीं वतनी हक्कांसंबंधानें उमाजीची भोरकर पंतसचिवाविरुद्ध तक्रार व गाहाणं होतें. व त्या तक्रारीची दाद त्याचे समजुतीप्रमाणें यथान्याय न लागल्यामुळे बेदादीचें उहें त्यानें बेबंदशाहीनें काढण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट चरित्रकारांनी नमूद केलेली आहे. तथापि कारण कोणतेंहि असो, उमाजीसारख्या सद्गुणी, बुद्धिमान व पराक्रमी पुरुषाची प्रवृत्ति दरोडे व खून यांसारख्या उपद्रवी व घातक कृत्यांकडे झाली ही गोष्ट अत्यंत शोचनीय होय यांत शंका नाहीं. ग्रीक बादशहा अलेक्झांडर याची व एका दरोडेखोराची गांठ पडली असतां 'माझें फसलें भी सांपडलों, म्हणून मी दरोडेखोर ठरलों; तुझें साधलें म्हणून तुला राज्यपद मिळाले, एखीं तूं व मी सारखेच असा युक्तिवाद करून अलेक्झांडर यास सदरहू दरोडेखोराने निरुत्तर केल्याचे आपण इंग्रजी पुस्तकांतून वाचतो. परंतु एका दरोडेखोरानें दुसन्यास निरुत्तर केल्याने कोणच्याहि दरोड्याचे समर्थन झालें, असें मात्र नाहीं. दरोडेखोरीच्या गुणावगुणासंबंधाचा निवाडा वादी व प्रतिवादी यांच्या परस्परकोटिक्रमावरून करावयाचा नसतो, तर न्यायनीतीच्या सनातन कायदेकानूंवरूनच लावावयाचा असतो. जे जात्या वाईट तें वाईटच. उमाजी नाईकानें मनांत मोठी आकांक्षा धरली होती, हें जरी खरें असर्हे तरी त्यानें ज्या लोकांस द्रव्य मिळवि- ण्याचे काम विनाकारण गांजलें, लुटले व मारले त्यांनी त्याचा असा