पान:इतिहास-विहार.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उमाजी नाईकाचें चरित्र

१३७

नाहीं' हैं म्हणणें जरा विपरीत भासेल. पण आजपर्यंतच्या जगाच्या इंति- हासांत बख्या सज्जनांच्या बरोबरीनें बड़े दुर्जनहि होऊन गेलेले नमूद t आहेत; दोघांची संख्या जवळजवळ समसमानच भरेल असें म्हटलें असतांहि तोच अर्थ निष्पन्न होतो; मात्र त्यांतील विपरीतपणा भासत नाहीं, इतकेच काय ते. इंग्रजी भाषेत सुप्रसिद्ध 'बारा बदमाषांची चरित्रे' या नांवाचा एक ग्रंथ आहे; पण आजपर्यंत इंग्लंडांत हेच काय ते व एवढे बाराच बदमाष निर्माण झाले होते; असें त्यापासून अनुमान न काढता, हे बारा लोक बदमाष होऊन गेले खरे, पण त्यांनीं आपले नांव अजरामर केलें; असें अनुमान वरील ग्रंथाच्या नांवावरून काढणें अधिक योग्य होईल हैं उघड आहे. प्रसिद्धि व चांगुलपणा या शब्दांची समव्याप्ति असावी, पण दुर्दैवाने ती तशी नाही. प्रसिद्धि व ऐतिहासिक महत्त्व यांची मात्र व्याति समान आहे. जगांत अनेक सज्जन जन्मास येतात व मरून जातात, असें नित्य घडत असेल; परंतु 'ऐतिहासिक दृष्टीने' पाहतां 'महत्त्व' हाच काय तो एक खरा गुण दिसतो. नुसतें सज्जन होऊन भागत नाहीं. मनुष्य महत्त्वाचा असून वरतीं सज्जनहि असला तर अर्थात् दुधांत साखर पडल्या- सारखेच झालें. पण इतिहासास सौजन्य नसले तरी हरकत नाहीं; त्यास दौर्जन्यहि चालेल; पण तें तरी जगास तोंडांत बोट घालावयास लावणारें पाहिजे !

 रा० भागवत यांनीं उमाजी नाईकाचें जें चरित्र लिहिलें आहे, तें झालें तरी याच दृष्टीनें . एक वेळ उमाजी नाईकाचा पोवाडा ऐकून इतर श्रोत्यां- प्रमाणे त्यांनाहि कौतुक वाटलें. महाराष्ट्रांतील भोर व फलटण या संस्थानां- चा इतिहास लिहिण्याचे वेळीं तें नांव त्यांच्या डोळ्यांपुढे फिरून आलें. एवढेच नव्हे तर या संस्थानांच्या कागदपत्रांत त्यांना उमाजीच्या बंडाची थोडीशी माहितीहि मिळाली. ही माहितीहि व कॅप्टन मॅकिटॉश यांनी लिहून ठेवलेलें उमाजीचें चरित्र इतका आधार घेऊन रा० भागवत यांनी सदर चरित्र मराठीत लिहिलें आहे तें मराठी वाचकांस मनोरंजक वाटेल यांत संशय नाहीं. उमाजीच्या चरित्रांत म्हणण्यासारख्या गोष्टी फारशा घड- लेल्या नाहीत. दरोडे, मारामाऱ्या आणि शौर्यानें व शतीनें निभावून जाण्याचे प्रसंग व शेवटी ठराविक कारणानें म्हणजे विश्वासघाताने पकडले