पान:इतिहास-विहार.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबई- व इंग्रज

१३५

आलें; व पुढे वीस वर्षांनीं दोन्ही व्यापारी कंपन्यांची एक संयुक्त कंपनी झाल्यावर, म्हणजे सन १७०८ सालीं, पश्चिम किनाऱ्याकडील कंपनीच्या मुलुखाचा एक स्वतंत्र इलाखाच बनून, मुंबई ही त्या इलाख्याची राज- धानी झाली. सन १७७३ साली तिन्ही इलाख्यांवर मिळून गव्हर्नर जनरल नेमण्यांत आला. त्या वेळीं मुंबईचा व कलकत्त्याचा संबंध जड़ला, मुंबईचा पुढील वृत्तांत महशूरच आहे.

उमाजी नाईकाचें चरित्र *

हा चरित्रग्रंथ रा० अनंत नारायग भागवत यांनी लिहिला असून, हा त्याची एक मत आमच्याकडे अभिप्रायार्थ पाठविल्याबद्दल आम्ही रा० भागवत यांचे आभारी आहों.

 दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं च पौरुषं "- हैं. अर्थपूर्ण वाक्य वेणी- संहार नाटकामध्ये भट्ट नारायण यानें भारतीय वीर कर्ण याचे तोंडी घातलें आहे. कर्ण हा केवळ 'सूतपुत्र' होता, अशी अश्वत्थाम्याप्रमाणेच स्वतः कर्णाची समजूत होती, आणि, वादामध्ये जेव्हां अश्वत्थाम्याने कर्णाच्या नीच कुलास अनुलक्षून त्याच्या सर्मावर घाव घातला, तेव्हां, कर्णाच्या अंगी असलेल्या खऱ्या क्षात्रतेजास साजेल अशा प्रकारचें ओजस्वी वाक्य त्याच्या तोंडास आलें व 'सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहं । दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं च पौरुषं' असें तो अश्वत्थाम्यास म्हणाला. असे वर्णन या प्रतिभासंपन्न नाटककारानें केलें आहे. परंतु वरील वाक्य वास्तविक पाहतां कर्णास मुळींच लागू पडत नाहीं. कारण तो खरोखर कुंतीचा पुत्र व अस्सल क्षत्रियच होता. आमच्या मतें हें वाक्य उमाजी रामोशासारख्या हीनकुलोत्पन्न शूर पुरुषासच अधिक यथार्थतेनें लागू पडेल. आज जवळजवळ शंभर वर्षे झाली त्या काळी पेशवाई जाऊन इंग्रज सरकारचा अंमल महाराष्ट्रांत पूर्णपणें स्थापित झाला असतां, केवळ समोशासारख्या कुलांत जसा एक पुरुष होऊन गेला कीं, त्यानें कांह


० केसरी, ता. ९ एप्रील १९१०