पान:इतिहास-विहार.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
केळकरांचे लेख

अर्थात् ते अडाणी, मागसलेले, दारुबाज, अनीतिमान् असे असत. अशा स्थितींत असणारे मुंबई बेट राजास आंदणादाखल दिल्याबद्दल इंग्लंडां- 'तील लोकांस आनंद वाटण्यासारखा नव्हता. पोर्तुगीज राजकन्या वांझोटी आमणे तिच्याबरोबर मिळालेलें आंदणहि तसेच निष्फळ असें समजून लोक नाराजच होते. हे आंदण घेतले त्यांत झालें तरी मुख्य हेतु पश्चिम .. हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य वाढविण्याचा नसून नवीन उदयास आलेल्या डच दर्यावर्दी लोकांविरुद्ध खालावलेल्या पोर्तुगीज लोकांना मदत कर ण्याचाच होता. अर्थात् चार्लस राजास आपल्या पोर्तुगीज राणीप्रमाणे तिजबरोबर मिळालेल्या आंदणाचाहि कंटाळा येऊन त्यानें सन १६६८सालीं मुंबई बेट " ईस्ट इंडिया " कंपनीच्या हवाली केलें आणि तिनें सदर जहागिरीच्या स्वामित्वाबद्दल सालीना फक्त दहा पौंड म्हणजे सुमारे १०० - रुपये राजास द्यावे असा करार ठरला ! पण इंग्रजी राष्ट्राच्या एकंदर इतिहासाची मौजच अशी आहे कीं, त्यांतील बराचसा मनोवेधक भाग | राजदंड धारण करणाऱ्या राजाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षां तागडी- तुकाप्पांच्या दाम व टक्के यांच्या आवडीनेच घडून आला आहे. हिंदु- स्थानांतील दिल्ली, विजापूर, पुणे वगैरे अर्वाचीन- किंवा तक्षशिला, पाटणा, अवंती वगैरे प्राचीन शहरें केवळ राजधान्या - राजेलोकांचीं राहण्याची व राजदरवारचीं शहरें - म्हणून प्रसिद्धीस व भरभराटीस आलेली होती. . इंग्रजांच्या इतिहासांतील वास्तुदेवतेची आवड निराळ्या प्रकारची दिसते; तिला राजदरबारच्या वैभवापेक्षां एखाद्या वखारीतील संपन्नता अधिक - प्रिय असलेली आढळते व याच नियमास अनुसरून हिंदुस्थानांत मोड- गाय पण इंग्रजांशी बरेच दिवसपर्यंत संबंध आलेल्या मुंबई नगरीची -भरभराट इंग्रज राजांच्या हातून न होतां इंग्रज व्यापाऱ्यांच्या हातून झालेली आहे. जें मुंबई बेट खुद्द इंग्रज राजाचे ताब्यांत असेपर्यंत नापीक, बांझोटें व निरुपयोगी असे वाटत होतें तें इंग्रज व्यापारी कंपनीच्या हातीं जातांच त्याच्या भाग्योदयास सुरुवात झाली. सन १६८७ सालीं इंग्रज कंपनीनें आपलें सुरतेचें ठाणे मोडून मुबईस आणिलें. शिवाजी मृत्यु पावल्यामुळे तिला गुजराथेतलें ठाणे उठवून तें व्यापारास अधिक सोईच्या अशा कोंकणपट्टीच्या बंदरावर आणून ठेवण्यास सहजच उत्तेजन