पान:इतिहास-विहार.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शनिवारवाड्यांचा जीर्णोद्धार

११

होती. “ शके १७१३ ज्येष्ठ शुद्ध पंचमी ( रोजी ) श्रीमंतांचे वाड्यांत कळशी बंगला सातमजली होता त्यास आग लागून जळाला व कोटी जळाली ( ७ जून १७९१ ) असा उल्लेख एका ऐतिहासिक टिपणांत सांपडतो (भा. इ. सं. इतिवृत्त शके १८३५ - पृ. ३९१). दुसरी आग सन १८११ साली लागली तेव्हां अस्मानी महाल जळाला. तिसरी आग सन १८२८० लागली व तिनें सर्व वाडा जमीनदोस्त झाला, या आगीचें साल सन १८२२ असे सुमारें नऊ वर्षांपूर्वी इतिहाससंशोधक मंडळापुढे बाचलेल्या एका टिपणांत श्रीमंत आबासाहेब मुजुमदार यांनी ठरविले होते व हें टिपण केसरीत तेव्हां प्रसिद्ध झालें होतें, परंतु इतिहाससंशोधनाचेहि संशोधन व दुरुस्ती होऊ शकते. त्याप्रमाणे श्री. मुजुमदार यांनीच सुमारें चार वर्षा- पूर्वी याच मंडळापुढे वाचलेल्या एका टिपणांत ती केली आहे. या नवीन माहितीप्रमाणे वाडा जळाल्याची तारीख २१ फेब्रुवारी सन १८२८ ही ठरते, ही तिथि गुरुवार फाल्गुन शुद्ध षष्ठीसह सप्तमी शके १७४९ सर्व- जितनाम संवत्सरे अशी आहे.

 मुंबई गॅझेटिअरमध्यें गुरुवार फाल्गुन शुद्ध षष्ठी अशी तिथि दिल्ली आहे. परंतु शक दिला नसून सन १८२८ पाहिजे तो १८२७ असा दिला आहे. आग पंधरा दिवस जळत होती असे गॅझेटिअरमध्यें म्हटलें आहे. पण श्रीमंत मुजुमदार यांच्या दप्तरांतील कागदपत्रांवरून आग फक्त दोन दिवस टिकली असें दिसतें. या पत्रांतील एक उतारा खालीलप्रमाणें आहे. " शुद्ध सप्तमी गुरुवारी थोरला वाडा शनिवारचा येथें अमीचा उपद्रव होऊन चौसोपी व आरसेमहाल, गणपतीचा रंगमहाल वगैरे दरोबस्त काम जळालें, मोठा प्रलय झाला. ( या गोष्टीला ) आठ दिवस झाले. चुकून पांच पन्नास खण राहिले. साहेबांनी प्रयत्न केला; तथापि उपाय चालला नाहीं. दोन दिवस आगीचा उपद्रव होता." वरील पत्रांत शुद्ध सप्तमी लिहिण्याचें कारण त्या वेळचें पंचांग पाहतां असें दिसतें कीं, या. गुरुवारी सूर्योदयाला ष्ठी होती, पण ती फक्त नऊ साडेनऊ घटका होती. आग दोन प्रहरी लागली असा याच कागदोपत्रीं दुसरे ठिकाणीं उल्लेख आहे. अर्थात् आग लागण्यापूर्वी तिथि बदलून षष्ठीची सप्तमी झाली होती. शनिवारवाड्यांवर संगमरवरी स्मरणशिला सरकारने बसवली आहे. त्यावर