पान:इतिहास-विहार.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

१३१

महाराष्ट्रीय घराणीं धनिक असून ऐतिहासिकाहे आहेत, त्यांच्यावर तरी इतिहास संशोधनाच्या कार्याचा पहिला हक्क आहे, यांत शंका नाहीं. व याविषय रा ० राजवाडे यांनी आपल्या अकराव्या 'खंडा'च्या प्रस्तावनेत स्फूर्तिदायक असे जे कळकळीचे उद्गार काढले आहेत ते जसेच्या तसे उद्धृत करून हा लेख पुरा करूं. ते उदार असेः – “ साधने प्रकाशण्या- संबंधानें एक चमत्कार आज कित्येक वर्षे मी निमूटपणे पहात आहे, तो असा कीं, शिंदे, होळकर, गायकवाड, आंग्रे, पटवर्धन, विंचूरकर, पवार, राजेबहादुर, कोल्हापूरकर, तंजावरकर, फडणीस, प्रतिनिधी, फलटणकर, भोरकर, जतकर, हैद्राबादकर, जयपूरकर, जोधपूरकर, सागरकर व इतर लहानमोठे • संस्थानिक, जहागीरदार, इनामदार, देवस्थानवाले व मुत्सद्दी हे अद्यापपर्यंत काय करीत आहेत ? त्यांची दसरे किंवा त्यांच्यासंबंधाचे कागदपत्र आमच्यासारखा भिकारड्यांनीं शोधण्याचा व छापण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासारख्या श्रीमंतांनी अगदीच उदासीन व निद्रिस्त असावें, ह्रा कोठला न्याय ? काय, त्यांचे पूर्वज त्यांचे कोणीच नव्हत १ पूर्वजांनी संपादिलेल्या जहागिरी व राज्यें भोगण्यास राजी, आणि त्यांचे पराक्रम व : इतिहास जाणण्यास गैरराजी; हा न्याय पृथ्वीवर इतर कोठेंहि पहावयास मिळावयाचा नाहीं. वासुदेवशास्त्रीं खन्यांनीं आपले घरदार विकून पटवर्धन दसर छापावें; आणि मिरजकर, सांगलीकर, जमखिंडीकर, ह्यांनीं खुशाल. झोपा काढाव्या ! शिवाजी महाराज, दमाजी गायकवाड, परशुरामभाऊ पटवर्धन हे आम्हां संशोधकांचे आजे पणजे आहेत आणि संस्थानिकांचे कोणी नाहीत, असेंच म्हणण्याची पाळी आली ! संस्थानिकांची व इनाम- : दारांची आपल्या प्रत्यक्ष पूर्वजांसंबंधानें केवढी ही विस्मृति ! केवढा हा अपराध ! ही भरतभूमि पितृपूजेविषयीं प्रख्यात आहे, तींत प्रस्तुतकाळ पितरांची अशी बोळवण व्हावीना ?"