पान:इतिहास-विहार.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

१२९

एकसूत्रता इतर इतिहाससंशोधकांमध्ये क्वचितच दिसून येते, रा०व० पारसनीस यांजसारखें द्रव्यसाधन किंवा रा० राजवाडे यांच्यासारखें: संचार स्वातंत्र्य नसतांहि रा० खरे, यांनी आजवर सुमारें ५००० पृष्ठे- भरतील इतकी ऐतिहासिक सामुग्री सर्वस्वीं स्वावलंबन व स्वाभिमान यांच्या भिस्तीवर प्रसिद्ध केली आहे, व अद्यापहि त्यांचा उद्योग निश्चयीपणानें सुरू आहे. रा० खरे यांच्या लेखांत रा० सान्यांप्रमाणेच विवेचकता व नेमस्तपणा असून जमलेल्या ऐतिहासिक साधनसामुग्रीवरून संगतवार इतिहास प्रबंध लिहिण्यास तेच फार योग्य आहेत.

 पण या सर्वोहून रा० राजवाडे यांचा उद्योग दांडगा व त्यांचे यश श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र इतिहास संशोधनासंबंधानें त्यांच्या हातून जितकी चळवळ व जितका स्फूर्तिकारक उद्योग झाला तितका आजपर्यंत कोणाहि महाराष्ट्रीय इतिहास-संशोधकाकडून झाला नाहीं या म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं, मराठी भाषेचा किंवा मराठी इतिहासाचा असा कोणताहि काळ नाहीं कीं, ज्यासंबंधानें रा ० राजवाडे यांनी थोडेंना थोडे तरी संशोधन व थोडी- ना थोडी तरी चर्चा केली नाहीं. या धाडसी संशोधकाच्या हातून महाराष्ट्रा च्या निरनिराळ्या भागांवर झालेल्या स्वाया. पूर्वकालच्या मराठी लष्करांच्या स्वाप्रमाणेच यशस्वी झाल्या व होत आहेत. पायाळू माणसाला जसें भूमिगत द्रव्य हटकून सांपडतें म्हणतात तशीच कांहींशी स्थिति इतिहास- संशोधनासंबंधानें राजवाड्यांची आहे. त्यांच्या इतक्या बिनमुरखतखोर * स्वभावाच्या माणसाच्या हातून ऐतिहासिक लेखांची गुप्त भांडारें अशी कशीं उघडली गेली हा सकृद्दर्शनी एक मोठाच चमत्कार वाटतो. ऐति- हासिक लेख मिळविणें, त्यांतील मजकुराची नक्की किंमत करणे, त्यांचा दर्जा लावणें व त्यांवरून प्रमेय सांगणे या गोष्टींविषयीं राजवाडे यांना चिरपरिश्रमानें जणूंकाय एक प्रकारची सिद्धिच प्राप्त झाली आहे असें म्हणता येईल. मात्र कागदपत्र प्रसिद्ध करण्याच्या काम एकसूत्रीपणाच्या अभावाचा दोष त्यांच्या संशोधनाच्या कार्यात उघड दिसून येतो. तसेंच थोडया पुराव्याच्या पायावर अनुमानाची भली मोठी इमारत उठविण्याचे धाडस ते पुष्कळ वेळां करतात; आणि प्रतिपक्षावर टीका करण्याच्या भरांत येण्यास त्यांना फारसा वेळ लागत नसून, भरांत आल्यावर त्यासंबंधों