पान:इतिहास-विहार.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
केळकरांचे लेख

रामदासाचें चरित्र व ग्रंथ यांसंबंधानें केलेले संशोधन; रा० सरदेसाई यांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तकें, नातूंचा महादजी शिंदे, जिवबादादा केरकर (बक्षी ) यांच्या चरित्रासारखे ग्रंथ, संस्थानिक व जहागीरदार यांच्या घराण्यांचे इतिहास, रा० अनंत नारायण भागवत यांची ऐतिहासिक पुस्तकें, रा० राजारामशास्त्री भागवत, रा० भानू, रा० बा. ना. देव वगैरेचे ऐतिहासिक लेख इत्यादि अनेक प्रकारची ऐतिहासिक सामुग्री अनेकांच्या हातून निर्माण झालेली आहे.

 परंतु त्यांतल्यात्यांत पाहतां साने, राजवाडे, खरे व पारसनीस इतक्यां च्याच हातून नांव घेण्यासारखी भरीव कामगिरी झाली. साने यांच्या हातून पूर्वी सुमारें बीस बावीस बखरी, भूषणकविकृत शिवराजभूषण काव्य व सुमारें ५०० ऐतिहासिक कागदपत्र प्रसिद्ध झाले असून साने हे अद्यापहि इतिहास संशोधनाच्या कार्मी आपले लक्ष जागरूक ठेवीत असतात. रा० साने यांचे मितभाषी, टापटिपीचे व सुविनीत ऐतिहासिक लेख हे खरोखर प्रत्येक इतिहाससंशोधकाला अनुकरणीय आहेत. अस्सल ऐतिहासिक कागदपत्र मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्याचे काम राजवाडे, पारसनीस व खरे यांच्या हातून प्रथम सुरू झाले. रा० ब० पारसनीस यांच्या चिकित्सेत बिनचूकपणा अथवा मार्मिकपणा कमी असला तरी ऐतिहासिक लेख व वस्तु यांचा संग्रह करण्याच्या कामी त्यांच्या पदरीं पुष्कळ यश पडले आहे. किंबहुना इतिहास संशोधनाचा जिसका अनेक विध उपयोग रा०ब० पारसनीस यांस स्वतःला करून घेतां आला तितका तो राजवाडे व खरे यांसहि करून घेता आला नाहीं ! 'ब्रह्मेद्रस्वामींच्या चरित्र' प्रसंगाने त्यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांपेक्षां 'भारत वर्ष' मासिक पुस्तक अधिक आशाप्रद होतें. पण भारतवर्षापेक्षां दल्लीं सुरू असलेल्या त्यांच्या 'इतिहास - संग्रहाचें महत्त्व फारच अधिक आहे. सातारा व मेणवली येथील दत्तरें, मध्य हिंदुस्थानांतील संस्थानांतून मिळविलेले कागदपत्र व विलायतेतील इंडिया ऑफिस व ब्रिटिश म्यूझियम यांतील ग्रंथसंग्रहांतून मिळविलेले कागद- पत्रांचे उतारे ही सर्व साधनसामुग्री विचारांत घेतली असतां, रा० ब० - पारसनीस यांच्या उद्योगाची कल्पना येते. रा० खरे यांचे काम एका विवक्षित कालापुरते असले तरी त्यांच्याइतकी टापटीप, व्यवस्थितपणा व