पान:इतिहास-विहार.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

१२७

इतिहासापुरतेच झाले. डॉ० भांडारकर यांनी दख्खनचा इतिहास लिहून प्राचीन व अर्वाचीन दोनहि कालांच्या इतिहाससंशोधनाविषयीं आवंड प्रकट केली. पण त्यांतल्यात्यांत पाहिलें तर डॉ० भांडारकर यांना आधु- निक इतिहासाचे संशोधक या सदराखाली मांडतां येणार नाही. त्यांचा कल बराचसा प्राचीन संशोधनाकडे आहे. रा० कीर्तने यांची अँट डफवरील टीका हा आधुनिक महाराष्ट्रीय इतिहास चिकित्सेचा पहिला नमुना होय. कीर्तन्यांच्या टीकेनंतर विविधज्ञानविस्तारांतून एक बखर, एक राजनीति व काशीराजाच्या पानपतच्या बखरीचें भाषांतर अर्शी तीन प्रकरणे प्रसिद्ध झाली आणि हाच ऐतिहासिक संशोधनरूपी नदीचा खरा उगम होय. पुढे लवकरच साने, मोडक, चिपळूणकर यांच्या 'काव्येतिहास संग्रह - रूपानें ही नदी जी अखंड वाहण्यास सुरुवात झाली ती आजवर एक- सारखी वाहत आली असून, दिवसानुदिवस तिचा प्रवाह अधिकाधिक विस्तार पावू लागला आहे. यापुढे प्रभु लोकांच्या इतिहासाची साधनें प्रसिद्ध होऊं लागली. बडोदें येथें शिवराजाच्या दोन बखरी छापल्या गेल्या. याच सुमारास मिरज येथे रा० वासुदेवशास्त्री खरे यांच्या इति- हाससंशोधनास सुरुवात झाली. १८९२-९३ साली रा० पारसनीस यांनी झाशीकर राणीचें चरित्र लिहिलें. १८९५ साली शिवाजीच्या स्मारकाची चळवळ रा०च० रानडे यांच्या कल्पनेनें, महाराष्ट्रांतील संस्थानिकांच्या सहानुभूतीनें व रा० टिळक यांच्या उद्योगानें सुरू झाली. १८९६ साली रा० पारसनीस यांच्या 'भारतवर्ष' नामक मासिक पुस्तकास सुरुवात झाली. सन १८९७ च्या सुमारास रा० खरे यांचा 'ऐतिहासिक लेखसंग्रह' प्रसिद्ध होऊं लागला. व पुढे लवकरच राजवाडे यांची 'मराठ्यांच्या इतिहासाची - साधनें' प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. अशा रीतीनें इतिहाससंशो- धनाचे काम बरेंच फैलावून अनेक उपयुक्त लेख व ग्रंथ एकामागून एक बाहेर पडले. त्यांत न्यायमूर्ति रानडे व तेलंग यांचे इतिहासावरील इंग्रजी लेख, रा० ठाकूर यांचा 'थोरल्या माधवरावावरील निबंध', 'डेक्कन व्हन- क्युलर सोसायटीनें छापलेल्या पेशव्यांच्या 'रोजनिशा', खरे यांचे 'नाना- - फडणविसांचे चरित्र', 'अधिकारयोग' हा निबंध, 'हरिवंशाची बखर' व 'इचलकरंजी संस्थानचा इतिहास; रा० शंकरराव देव व चांदोरकर यांनी
के... ९