पान:इतिहास-विहार.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
केळकरांचे लेख

संशोधकांचे श्रम खर्ची पडलेले असून, त्यांतील ऐतिहासिक माहितीचा संग्रह बराच चांगला आहे. उदाहरणार्थ डॉ० भांडारकर यांचा 'दख्खनचा प्राचीन इतिहास' म्हणून जो ग्रंथ प्रसिद्ध आहे तो मूळ ग्यझेटियरसाठीच लिहिलेला होता. यावरून ग्यॅझेटियरमध्ये संग्रहित झालेल्या ऐतिहासिक, साधनांच्या कार्याविषयीं कांहीं कल्पना येऊ शकेल. ग्यझेटियरसंबंधानें एक गोष्ट विशेष लक्षांत ठेविली पाहिजे ती ही कीं, हे ग्रंथ सरकारी रीतीनें: प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांचा संपादक या नात्यानें एखाद्या बढ्या युरोपियन गृहस्थाचें नांव जाहीर होते; परंतु त्यांना साहाय्य करणारे अनेक एतद्देशीय विद्वान् शास्त्री वगैरे असत, व त्यांचीं नांवें जरी लोकप्रसिद्ध नाहींत तरी. त्याजकडून झालेलें इतिहाससंशोधनाचे गुप्त दान महाराष्ट्रीय चित्रगुप्ताच्या बद्दीला जमा झालेले आहे. पंडित भगवानलाल, रा० पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी वगैरे संशोधक या सदराखाली येतात. कित्येकांच्या मतें पंडित- भगवानलाल यांस इंग्रजी चांगले येत असतें व ते स्वभावानें जरा कमी: भिडस्त असते तर त्यांचा लौकिक डॉ० भांडारकर यांच्या बरोबरीचाः व्हावा इतकी त्यांची कामगिरी महत्त्वाची होती.

 यानंतर आपण स्वयंस्फूर्तीच्या व स्वतंत्र अशा देशी संशोधकांकड़े वळू. इंग्रजी विद्येचा प्रसार झाल्यावर परदेशी इतिहास व परदेशी ऐति- हासिक विवेचनपद्धति यांचा परिचय झाल्यामुळे संशोधनाची व चिकित्से- ची दृष्टि सुशिक्षित लोकांना येऊ लागली. पण शिक्षणप्रसारास सुरुवात झाली त्या काळी त्यांचा बराचसा वेळ बालोपयोगी व शालोपयोगी ग्रंथः रचण्यांतच गेला; यांमुळे जांभेकरशास्त्री, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशा बुद्धिवान् व विद्वान् सुशिक्षितांच्या हातून संशोधन व चिकित्सा यांविषय कांहीं काम झालें नाहीं. 'अनेक विद्या - मूलतत्त्र' व कांहीं व्याकरण-- विषयक ‘निबंध' यांखेरीज मराठी भाषा व इतिहास यांना थोरल्या चिपळूणकर शास्त्रीबोवांचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. युरोप खंडां तील देशांचे इतिहास व इतिहासचर्चा वाचून जी चिकित्सक बुद्धि आमच्या इकडे आली तिची पहिलीं फळें डॉ० भाऊ दाजी, डॉ. भांडारकर, रा०नीलकंठराव कीर्तने इत्यादि गृहस्थांच्या उद्योगांत दिसून आली. पैकी डॉ. भाऊ दाजी यांच्या संशोधनाचें काम प्राचीन व मध्यकालीन