पान:इतिहास-विहार.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासांचा उद्धार

१२५

आदरबुद्धि दिसून येते हें कोणाहि सरळ बुद्धीच्या मनुष्यास नाकबूल करिता यावयाचे नाहीं. एरवी तो हें इतिहासलेखनाचे काम मुळीं अंगावरच घेताना 1 शिवाय त्याच्या स्वार्थत्यागावरून पहातां त्याच्या हेतूविषय सर्वस्वीं कुत्सित अनुमान काढणे बरोबर होणार नाहीं. त्यांच्या मँयाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत प्रकाशकानें त्याचें जें आत्मनिवेदन प्रसिद्ध केलें आहे तो सर्वस्वा शिष्ट सत्यापलाप मानावयाचा असेल तर गोष्ट चेगळी; पण इतर कामे संभाळून, जाग्रण करून, दुखणाऱ्या डोक्यास गार पाण्याच्या पट्टया बांधून अँटडफनें हा ग्रंथ लिहिला. तो लिहिण्यास कोण बक्षिस लावले नव्हते. त्याचा ग्रंथ कोणीहि प्रकाशक प्रथम घेईना. मराठ्यांविषर्थी माहिती हवी कोणाला ? याकरितां "मराठ्यांचा इतिहास': हे नांव बदलून 'मोंगल रियासतीचा न्हास' किंवा 'हिंदुस्थानांतील इंग्रजी सत्तेचा उदय' असें प्रयास नांव द्या तर तो आम्ही घेऊ असे प्रकाशकानें सांगितलें असतांहि अँटडफ तें नाव बदलण्यास तयार झाला नाही, पुस्तक छापून तयार झाल्यावरहि कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनी त्यांच्या फक्त चाळीसच प्रती विकत घेतल्या, छापखान्याकडे पाठविण्याची प्रत तयार होईपर्यंत लागलेल्या दोन हजार पौंडांपैकी १७०० पौंड खुद्द अँटडफ यास अंगावर सोसावे लागले. मग नफा मिळणे तर दूरच ! या सर्व गोष्टींवरून त्याच्या हेतूविषयीं तरी शंका राहूं नये. एवढेच नव्हे तर मराठी इति ह्रासाच्या निःस्वार्थी, उदार व एकनिष्ठ संशोधकांत त्याची गणना होणें हेत्व न्यायास अनुसरून आहे. अँटडफच्या ग्रंथानंतर आम्हांला हजारौ अस्सल कागदपत्र उपलब्ध झाले असल्यामुळे त्या ग्रंथांतील शेकडों चुका दाखविता येणें आज आपणांस शक्य झाले आहे आणि त्या आजच्या इतिहाससंशोधकांनीं अगत्य दाखवाव्याहि. पण केवळ अशा चुका: दाखवितां अल्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीत लिहिलेल्या या ग्रंथाचे महत्त्व कमी होऊ शकत नाहीं.

 मराठी इतिहासाच्या इंग्रज संशोधकांची यापुढील पिढी म्हटली म्हणजे मुंबई ग्यझेटियरकार मि० कॅम्बेल, मि० फॉरेस्ट, मि० फ्लोट, मि० जॅक्सन वगैरे लोकांची. अँटडफच्या अथाप्रमाणे मुंबई ग्यझेटियरमध्येहि पुष्कळच चुका व अपसिद्धान्त आहेत. पण त्यांत एकंदरीनें अनेक देशी व विदेशी