पान:इतिहास-विहार.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
केळकरांचे लेख

कंपनीचे ऑफीसमधील कागदपत्र व पोर्तुगीज सरकारने पाठविलेले स्वतःच्या कागदपत्रांतील उतारे हेहि अँटडफ यास मिळाले होते. शिवाय महाराष्ट्रांतील राजेरजवाडे, संस्थानिक, सरदार, देवस्थानांचे व्यवस्थापक वगैरेंकडून अस्सल कागदपत्र व माहितीची टिपणेहि, कांहीं अधिकाराच्या जोरावर, कांहीं मोहबतीखातर त्यानें मिळविली होती. मराठी व पर्शिअन भाषेतील बर्डे टडफकडे शेकडों येऊन पडली होती व त्यांतील कित्येक तर खुद्द अँटडफच्या संपूर्ण इतिहासग्रंथाएवढी मोठी होती असे खुद्द अँट डफनेच लिहिले आहे. अर्थात् ऐतिहासिक साधनसामुग्री मिळविण्यास जशी 'परिस्थिति पाहिजे तशी अँटडफ याला होती, यामुळे त्याचा ग्रंथ हे मराठी इतिहासाचें मुख्य भांडार अशा स्वरूपाचा झाल्यास त्यांत नवल नाहीं.

 आता ग्रटडफ हा किती झाला तरी परकीय; त्याला मराठ्यांचा म्हणून कांहीं विशेष अभिमान असण्याचें कारण नाहीं. शिवाय त्याच्या डोळ्या-' 'देखत त्याच्याच जातभाईंनी मराठ्यांचा पाडाव करून त्यांचे सर्व राज्य हिसकावून घेतलेले; यामुळे इंग्रज हे जेते व मराठे हे जित म्हणून मराठ्या- विषयीं त्याचा अनेक बाबतींत वाईट ग्रह असण्याचा संभव आहे आणि "कित्येक बाबतींत तो ग्रह खराहि असणार; कारण त्या वेळी मराठेशाहीतील गुणांचा लोप होऊन मराठ्यांच्या अंगच्या सर्व दोषांचा परिपाक झालेला उघड दिसत होता. दुसरें असें कीं, त्याच्यापुढे आलेली साधनें बरीचशी दुय्यम पुराव्याच्या स्वरूपाची असून, जे अस्सल कागदपत्र त्यापुढे होते ते सर्व समजून घेऊन व' चिकित्सेच्या रसायनाने पचनी पाहून मग इतिहास लिहिण्याइतका स्वस्थपणा किंवा सवड त्याला नसावी. या सर्व कारणांमुळे.. गॅटडफच्या ग्रंथांत अनेक चुका व दोष राहून गेलेले आहेत; पण निदान आम्हांस आश्चर्य वाटतें तें अँटडफच्या इतिहासांत इतक्या चुका व दोष कसे राहिले याविषयीं नाहीं; तर त्या चुका व दोष सर्व जमेस धरले असताहि एका इंग्रजानें मराठ्यांचा इतका चांगला इतिहास कसा लिहिला `याविषयीं! मँटडफनें हा इतिहास लिहिला यांत त्याचा मुख्य हेतु मराठ्या- चें वैभव इंग्रजांच्या निदर्शनास आणण्याइतका उदात्त नसून इंग्रजांना मराठ्यांची माहिती करून देणें असा स्वार्थी व कुत्सित होता असे कित्येक म्हणतात, पण एक तर त्याच्या लेखांत मराठ्यांविषय कांहीं कांही बाबतीत