पान:इतिहास-विहार.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार

१२३

अशा बखरींचा आधार आपल्या इतिहासग्रंथांत बराचसा घेतलेला आहे; ब. अशा सुमारे पंचेचाळीस पन्नास बखरी आजवर छापूनहि निघालेल्या. आहेत. या बखरी फारच स्फूर्तिकारक आहेत; पण कालनिर्णय, हकीकतींचे सापेक्ष महत्त्व व ऐतिहासिक सत्य यांच्या दृष्टीनें त्यांजवर सर्वस्वी भिस्त. ठेवतां येत नाहीं. त्यांचा पुरावा दंतकथात्मक म्हणजे दुय्यम प्रतीचा असल्यामुळें, तत्कालीन कागदपत्रांच्या अस्सल पुराव्यापुढे त्या फिक्या पडतात व केव्हां केव्हां खोट्याहि ठरतात.

 कालानुक्रमानें पाहतां बखरीनंतर इंग्रज इतिहासकारांचा परामर्ष घेतला. पाहिजे, ऑर्म, स्कॉट वेरिंग वगैरेंनी मराठ्यांच्या इतिहासावर थोडें बहुत लिहिलें, आहे; पण तें खरोखर थोडें असून, शिवाय त्यांना अस्सल कागदपत्रांचें साहाय्य असावे तितके नव्हते. हे साहाय्य असतें तर त्यांनी त्याचा उपयोग मात्र स्वचित फार चांगला केला असता; कारण त्यांना ऐतिहासिक व चिकित्सक बुद्धि होती. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल त्यांना अभिमान वाटण्याचे अर्थात् कारणच नव्हतें; व क्वचित्प्रसंगी मराठ्यांविषयींचे वाईट मत त्यांच्या सत्यान्वेषणाच्या मार्गांत आलें असण्याचाहि संभव आहे. पण एकंदरीनें मराठी बखरनविसांपेक्षां त्यांच्यामध्ये सत्यान्वेषणबुद्धि अधिक होती यांत शंका नाहीं. असो; या एकंदर इंग्रज इतिहासकारांमध्ये अग्रपूजेचा मान अँडफ यालाच दिला पाहिजे. याचे कारण असें कीं, त्यांचा ग्रंथ इतर सर्व इंग्रज ग्रंथकारांच्या ग्रंथाहून अधिक पूर्ण व अधिक विश्वसनीय आहे. इतकेंच नव्हे, तर अँटड़फ याने या कामी जो स्वार्थत्याग दाखविला तो एखाद्या निःसीम महाराष्ट्रीयासहि भूषणभूत झाला असता. अँट डफ या साधनसामुग्रीच्या दृष्टीनें प्राइतां सर्वत्र अनुकूलता होती. कंपनी-सरकारचे. मुंबई व सुरत येथील कागदपत्र तर त्यास पहावयास मिळालेच; पण पेशव्यांचें राज्य खालसा झाल्यामुळे खुद्द पेशव्यांच्या दप्तरांतील सर्व कागदहि त्यास मिळाले, शिवाय विशेष महत्त्वाचा असा एक संग्रह त्यास मिळाला.. तो सातारच्या राजांच्या घरचा. या संग्रहांत खुद्द पेशव्यांनाहि माहीत नसलेले असे अनेक कागदपत्र असले पाहिजेत; व स्वतः अँटडफ हाच सातारा येथील ब्रिटिश,रेसीडेंट असल्यामुळे त्याला या बाबतीत सर्वस्वीं मुक्तद्वारच होतें. बंगालच्या कास्भारासंबंधाचे विलायतेंतील ईस्ट इंडिया